हम आदिलशहा याचा तळ पडला होता, त्याठिकाणी येऊन शहास मिळाले; त्यामुळें दिला- वरखानाचा पराभव झाला, आणि तो आपल्या सैन्यासह शहादुर्गकडे परत फिरला. यावेळीं फेरिस्ता हा दिलावरखानाबरोबर असून त्याने या युद्धांत भाग घेतला होता. तो हणतो:- " या युद्धांत मला जखमा झाल्या; त्यामुळे मला दिलावरखानाच्या सैन्याचशेचर शहादुर्गकडे जाता आले नाहीं आणि मी जमालखानाच्या हातीं सांपडलों; परंतु मी लवकरच त्याच्या छावणीतून पळून जाऊन माझी तेथून मुक्तता करून घेतली. "या अवधीत बु-हाण
निजाम-शहा हा जमालखानाबरोबर युद्ध करण्याच्या तयारीनें त्याच्यावर चाल करून आला; त्या- मुळे विजापूर हराच्या सैन्याबरोबरील युद्धाचा बेत रहित करून त्यास बुन्हाणशहाच्या सैन्याकडे वळणे भाग पडलें; व इकडे जमालखानाच्या तावडीतून निसटलेला फेरिस्ता विजापूरकरांच्या सैन्यांत सुरक्षित येऊन दाखल झाला. जमाल खानाने निजामशाही सैन्याकडे पाठ फिर- विल्याबरोबर विजापूरकरांच्या सैन्याने अजमासें १६० मैलपर्यंत ह्मण ने रोहण से ज्याच्या घाटात त्याचा सारखा पाठलाग केला; परंतु या ठिकाणीही पुन्हां आदिलशहा व त्याचा वजीर दिलावरखान यांच्यामध्ये मतभेद झाला. वास्तविकरीत्या दरसन येथील युद्धापासूनच या मतभेदास तीव्र स्वरूप येत चाललें होते; आणि आतां तर पुन्हां मतभेद झाल्यानें त्याची पावधि होण्याचा रंग दिसूं लागला होता. इब्राहीम आदिलशहा अज्ञान होता तोपर्यंत दिला - वरखान ह्मणेल ती पूर्वीदेशा, अशी आदिलशाही राज्याची स्थिति होती; परंतु शहा हा जस- जसा वयांत येऊ लागला तसतसा दिलावरखानाचा जाच त्यास असह्य होऊ लागला; व तो आपल्या हाती राज्यसूत्रे घेण्याची खटपट करूं लागला; दिलावरखान हा अतिशय हुषार व राजकारणकुशल असून त्यानें शहाच्या अज्ञानावस्थेत आदिलशाही राज्याचा कारभार उत्तम- प्रकारे चालविला होता; तथापि तो अतिशय स्वार्थी होता; व माजी प्रधान अबुल हुसेन याला ठार मारूनच त्यानें वजीरीपद मिळविले होते. अर्थात् आपल्या हाती आलेल्या सत्तेचा तिळ- मात्रही अंश शहाच्या हवाली करण्यास तो तयार नव्हता; इतकेंच नव्हे तर त्यानें शहावर नेहमी सख्त पाहरा ठेविला होता; व राजवाड्यांत स्वारीमध्ये आणि त्याच्या खास तैनातीत, त्याने आपल्याच पक्षाची व पूर्ण विश्वासाची मंडळी ठेविली होती. त्यामुळे दिलावर खानाच्या मगरमिठींतून आपण कसें मुक्त व्हावे या विचारांत तो मग्न होता. अखेरीस त्यानें ऐन-उल्- मुल्कू गिनी या नांवाच्या एका शूर, बलिष्ट व दिलावरखानाच्या तोडीच्या सरदाराकडे मोठ्या गुप्तपणं संधान बांधिलें; आणि त्यास आपल्या पक्षाकडे ओढून घेतले. नंतर एके रात्री शहा घोड्यावर बसून आपल्या तळावरून अजमार्से एक मैलावर असलेल्या ऐन-उलू- मुल्कू याच्या तळावर जाण्यास निघाला; त्यावेळी त्याचा दूधभाऊ इलासखान हा पाहन्यावरील मुख्य अधिकारी होता, त्यानें शहास अशारीतीनें बाहेर जाण्याच्या तयारीत पाहिले, तेव्हां तो त्याच्याजवळ गेला; आणि " आपण कोठें जातो ह्मणून त्याने शहास विचारिलें;
पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/८५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५८ )