मिरान हुसेन हा अवघा दहा महिने व तीन दिवस गादीवर होता; या शहाच्या, आपल्या वडिलांच्या वधासंबंधीच्या कृतीवरून त्याचा सहाध्यायी प्रसिद्ध इतिहासकार फेरिस्ता याने असे उद्गार काढले आहे कीं, "ज्यांनीं आपल्या बापाचा वध करून गादी संपादन केली, असे राज्यकर्ते एक वर्षांहून अधीक काळपर्यंत गादीवर टिकलेले अथवा अशांची राज्य एक वर्षाहून अधीक काळपर्यंत टिकलेली असें आपल्या पाहण्यांतील इतिहासांत एकही उदाहरण आजपर्यंत आढळून आले नाहीं.
यावेळी फेरिस्ता यांचे वय सतरा वर्षांचे होते; निजामशाहीमधील त्याचा आश्रय- दाता मुर्तुजाशहा मृत्यु पावलेला होता; आणि नुकत्याच झालेल्या राजक्रांतीमुळे त्याचें मन त्या राज्यांत राहण्यास विटलेलें होतें; शिवाय निजामशाहीत सुनी पंथाचे अतीशय प्राबल्य माजले असून तो स्वतः शिवयाचा असल्याने त्यास तेथे कोणीही फारसे स्नेही सोचती नव्हते; त्यामुळे स्वाभाविकरित्याच तेथून दुसरीकडे जाण्याचा त्याने निश्चय केला व त्या- प्रनायें विजापूर येथे जाऊन तेथील प्रसिद्ध वजीर दिलावरखान यास भेटला; वजिराने त्याचे योग्य आदरातिथ्य केले; आणि सुलतान इब्राहिमराहा यास मेटवून त्याच्याकडून फेरिस्त्यास आपल्या आश्रयास ठेवून घेवविलें व त्यास तेथील सैन्यांत नौकरीही देण्यांत आली; व अतेरपर्यंत तेथेच तो वास्तव्य करून राहिला.
त्यानंतर लवकरच महूदी धर्माचा कट्टा अभिमानी व निजामशाही राज्याची सर्व सत्ता बळकावून बसलेला सरदार जमालखान याच्या विरुद्ध तेथील राज्याचा अधिकारी बु-हाण निजामशहा यास, त्याचे राज्य परत मिळविण्याच्या बाबतीत मदत करण्याबद्दल वजीर दिवावरखान यानें इब्राहिम आदिलशहाचे मन वळविले; परंतु त्यानंतर उभयतांमध्यें थोडासा मतभेद झाला; कारण दिलावरखानाचें मत असें होतें कीं, जमालखानावर एकदम चढाई करून जाऊन त्याच्याशी युद्धास सुरवात करावी; उलटपक्षी शहाचें मत असे होतें कीं, जमालखान हा चढाई करून आल्यानंतर त्याच्याबरोबर युद्ध करावें; इतक्यांत जमालखान हा नगरादून परांडा मार्गानें विजापूरच्या रोखाने चाल करून आला, तेव्हां इब्राहीम शहाच्या हुकुमाविरुद्ध वजीर दिलावरखान यानें मीमानदीच्या आसमंतांतील प्रदेशांत त्याच्या- वर हल्ला केला; परंतु या युद्धांत विजापूरकरांचे कित्येक प्रसिद्ध व शूर सरदार दिलावरखानास युद्धमनीवर सोडून सिना व भीमा या नद्यांच्या संगमाजवळील दरसन या गावी जेथें इब्रा-
टीप:- या फेरिस्त्याप्रमाणेंच औरंगज्ञेचाच्या कारकीर्दीत खाफीखान या नांवाचा एक प्रसिद्ध इतिहासकार होऊन गेला, तो नेहमी औरंगझेबाचगेचर रहात असे; त्यानें औरंगजेबाच्या कारकीर्दीचा एक मोठा महत्वाचा व सुंदर माहितीपूर्ण असा इतिहास लिहिला, परंतु औरंगजेब सुनीथी व खाफीखान शियापंथी, त्यामुळे औरंगज्ञेच जिवंत होता तोपर्यंत अज्ञातवासांत ठेवून, अवरंगजेबाच्या मृत्यूनंतरच त्यास तो प्रसिद्ध करावा लागला.
6