निजामशाहीच्या सरहद्दीवर येऊन दाखल झाले; तेव्हां लागलींच मिर्झाखान झही आपल्या सैन्यासह अहमदनगर येथून निघून राणी येथे येऊन मुक्काम करून राहिला. तेव्हा शहास मिर्झा खानाबद्दल संशय उत्पन्न झाला; व त्याने प्रसिद्ध इतिहासकार फेरिस्ता यास, "राणूरी येथें जाऊन मुक्काम करण्याचें कारण काय ? " ह्मणून मिर्झाखान याला विचारण्याकरितां तिकडे पाठविलें व त्याप्रमाणे फरिस्ता मितखानाच्या तळावर राणूरी येथे गेला; इकडे फेरिस्ता हा शहाच्या पक्षाचा आहे, आणि त्याला जर आपला खरा उद्देश समजला तर तो शहास ती सर्व हकीकत सांगितल्याशिवाय राहणार नाहीं, ही गोष्ट मिर्झाखान यास पूर्णपणे माहीत होती, ह्मणून त्यानें फेरिस्ता यास आपल्या गुप्त मसलतीचा कोणत्याही प्रकारें मागमूस न लागू देण्याबद्दल अतिशय सावधगिरी ठेविली; आणि इकडे अंतस्थरीया शहाचा जिवलग दोस्त फकीर फत्तेशहा यास मुबलक लांच देऊन त्यास आपल्या पक्षास अनुकूल करून घेतले; आणि मिखानाने आपल्या बरोबरील सैन्यासह पुढे विजापूरकडे कूच करून जावें, असा शहाचा हुकूम घेऊन फत्तेशहा यानेंच आपल्या छावणीत राणू येथें यावें; अशी तजवीज केली; त्याप्रमाणे फत्तेशहा हा निजामशहाचा हुकूम घेऊन मिर्झाखानस राणूरी येथें त्याच्या छावणीत येऊन मेटला; व त्यास शहाचा हुकूम देऊन तो नगर येथे परत गेरा; मध्यंतरी जरी मिर्झाखान यानें आपली मसलत फेरिस्ता यास सनजूं नये ह्मणून अत्यंत सावधगिरी ठेविली होती तरी फेरिस्ता यास मिखानाच्या अंतरंगातील मेद कळून आला; उलटपक्षी मिर्झाखान हाही अतिशय धोरणी असल्यानें, फेरिस्ता यास आपला खरा उद्देश पूर्ण कळून चुकला असावा; अशी त्यानें योग्य अट- कळ बांधिलो; व फेरिस्त्यास केद करण्याचा हुकूम दिला; परंतु ही बातमी फेरिस्त्यास अगा- ऊच मिळाली; तेव्हां तो मिर्झाखानाच्या छावणीतून रात्रींच जीव घेऊन पळाला; व थेट अहमदनगर येथें परत येऊन त्याने शहास व फकीर फत्तेशदास, मिर्झाखानाचा सरा उद्देश व घडलेली सर्व हकीकत निवेदन केली; परंतु फत्तेशहा हा मिर्झाखानास आंतून मिलाफी असल्यामुळे त्यानें " ही हकीकत खोटी आहे; " असें बाह्यात्कारी प्रतिपादन केलें, त्यावर फेरियानें त्यास पुन्हा असें बजाविलें कीं, माझें व मिर्झाखान याचे कोणत्याही प्रकारे वैमनस्य नाहीं, त्यामुळे त्याच्या सद्धेतूचा विपर्यास करण्याचे, अथवा त्याच्यावर खोटा दोषारोप कर- याचें मला कोणत्याही प्रकारें प्रयोजन नाही; आणि मी काय ह्मणतो याची तुह्मास लवकरच
ती आल्याशिवाय राहणार नाही; इतक्यांत शहाजादा मिरान हुसेन यास अहमदनगर येथे आणून गादीवर बसविण्यासाठी मिर्झाखानानें दोलताबाद येथें कूच केलें आहे, अशी बातमी आली; तेव्हा फेरिस्त्याच्या गण्याची आतां आपणांस सत्यता पटली, अतें फत्ते शहा याने वरपांगी दाखविलें व लागलींच त्याच्या धोरणानेच पूर्णपणे वागत राहणान्या
पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/८१
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५४ )