लागला होता. इतक्यांत शहाचा जिवलग स्नेही फकीर फत्तेशहा यास त्याची दया येऊन त्यानें दार उडून शहाजायास बाहेर काढले आणि दिवाण कासिम बेग याजकडेस त्याची ताबडतोब रवानगी करून दिली; त्याप्रमाणे शहाजादा कासीम बेगकडे सुरक्षित पोहोंचला; व त्याने घडलेली सर्व हकीकत त्यात सांगितली; तेव्हां अशा स्थितीत शहाजाद्यात राजधानीत ठेवणे धोक्याचें आहे, अशी कासीम बेग याची खात्री झाली व त्याने शहाजाद्याचा जीव बचावण्याकरितां त्याची ताबडतोच दौलताबाद येथे रवानगी करून दिली.
पुढे बन्याच वेळानें मुर्तजाशहा हा पुन्हा आपल्या मुलाच्या खोलीत गेला; आणि तेथें पडलेल्या राखेत त्याच्या हाडांचा तपास करूं लागला; परंतु तेथें त्यास एकही हाड आढळून 'आलें नाहीं; तेव्हां तो अतिशय संतापला; व यासंबंधीं त्यानें फतेहाजवळ तपास केला; तेव्हां फत्तेशहानें घडलेली खरी हकीकत त्यास सांगितली. वास्तविक फतेशहा यानेंच शहाजाद्यास वाचवून त्याची आपण होऊन कासीमवेगकडे रवानगी केली होती; ह्मणजे शहानेंच वास्तविक निर्दयपणाचे कृत्य करण्याचा प्रयत्न केला असून सुद्धां त्याच्या मताप्रमाणे न्यायदृष्ट्या जर कदाचित् कोणास अपराधी - शहाच्या इच्छविरुद्ध त्याच्या
मुलाचा जीव वाचविला ह्मणून व जरी तो वास्तविकरीत्या अपराध नव्हता तरी-गणावयाचें असेल तर तें त्यानें फत्तेशहासच गणावयास पाहिजे होते; परंतु तो शहाच्या पूर्ण प्रेमांतील असल्यामुळे त्याला फत्तेशहानें मुळीं अपराधच केला आहे, असे वाटले नाहीं; आणि शहानें त्याला या संबंधांत एक शब्दानेही दुखविलें नाहीं; पण चिचान्या कासिमबेगास मात्र त्यानें ताबडतोच पकडून त्याची प्रतिबंधांत रवानगी करून दिली; त्याच्या जागीं दुसन्या दिवाणाची नेमणूक केली; व त्यास शहाजाद्याचा वध करण्याची कामगिरी सांगितली; परंतु त्यानेही ती साफ नाकारली; त्यामुळे शहानें त्यास ताबडतोब कामावरून दूर केलें; आणि औपचारिकरीत्या आपण शहाच्या पक्षाचे आहों, असें त्यास भासविणा-या मिर्झा - खान या नांवाच्या एका सरदाराची शहानें, त्याच्याजागी नेमणुक केली.
परंतु वास्तविकरीत्या मिर्झबान हा राजपुत्र मिरानहुसेन याच्या पक्षाचा असून, मुर्तुजा शहा यास पदभ्रष्ट करून, मिरानदुसेन यास गादीवर बसवावें, अशी त्याची इच्छा होती; तथापि वरपांगीं तसें यत्किंचितही न दाखवितां, तो शहा हाणेल ती प्रत्येक गोष्ट मान्य असल्याचे दाखवू लागला; शहाजवळील नोकर-चाकर व विशेषतः फत्तेशहा यास, नेहमीं बक्षिसे व नजराणे देऊन, तो त्यांना खुष ठेवूं लागला व लवकरच त्यानें फते- खानाची पूर्ण मर्जी व विश्वास संपादन करून घेतला. शिवाय त्यानें अंतस्थरीतीने विजापूर- कराकडे, तेथील दिवाण दिलावरखान याच्या मार्फत संधान बांधिलें आणि तिकडून आपल्या मदतीस सैन्य येईल, अशी तजवीज केली. त्याप्रमाणे विजापूरकरांचे सैन्य