Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५५)

निजामशहाचीही तशी खात्री पटली; आतां या अरिष्टांतून सुरक्षित व यशस्वीपणे निभावून जाण्यास काय इलाज करावा, अशाबद्दल शहाला विवंचना उत्पन्न झाली; आणि त्याने "आता काय करावे ? "लणून फेरिस्त्यात प्रश्न केला; त्यावर फेरिख्याने शहास असें सांगितले की, आपण एकांतवासाचा त्याग करून आपल्या मंडळीसह शहराबाहेर निघावें; ह्मणजे बहुतेक सरदार मिर्झाखानाचा पक्ष सोडून आपणांस येऊन मिळतील; परंतु निजाम- शहा हा यावेळी आजारी असल्याने त्यास घोड्यावर बसण्याची शक्ती नव्हती; त्यामुळे दुसरा कांहीं उपाय असल्यास तो सुचविण्याविषयीं शहानें फेरिस्त्यात सांगितले; त्यावेळी, “ माजी वजीर सलाबतखान याची प्रतिबंधांतून मुक्तता करून त्यास पुन्हा पूर्वपदावर स्थापन करावें;"गजे तो लोकप्रिय असल्याने पुष्कळ मंडळी मिर्झाखानाचा पक्ष सोडून आपल्या पक्षास येऊन मिळतील; इतकेच नाहीं तर सलाबतखानाच्या मुलाखतीकरितां आपणही मर्जी असल्यास मेण्यातून जुन्नरपर्यंत जावें; " असे फेरिस्यानें शहास सुचविलें, शहास त्याचें गणे पसंत पडलें; स्थाने सलाबतखानास ताबडतोच बंधमुक्त करण्याविषयीं जुन्नर येथील किल्लेदारास मुद्दामहुकून पाठविला व स्वतः तिकडे जाण्याचीही त्याने तयारी केली; परंतु ही गोष्ट फत्तेसहानें ऐकल्यावर तो प्रतिपक्षास अंतस्थ रीतीनें फितूर असल्यामुळे त्यानें शहा- कडे जाऊन त्यास असें सांगितले की, आपण जर राजवाडा सोडून बाहेर जाल तर येथील पहारेकरी मंडळी नवीन शहाची मर्जी संपादन करण्याकरितां आपणांस कैद करून शहा- जायाकडे पाठवतील, हणून आपण राजवाडा न सोडतां येथेंच रहावें, फत्तेराहाचें हैं ह्मण शहास खरे वाटले; त्यानें आपला जुन्नरकडे जाण्याचा बेत रहित केला; व तेथेच तो सलाबतखानाच्या येण्याची मोठ्या आतुरतेने वाट पहात राहिला; परंतु शहाचे असें अस्थीर व धरसोडीचें वर्तन पाहून किल्ल्यांतील सर्व फौजेनें शहाचा पक्ष सोडून मिर्झाखानाच्या पक्षात जाऊन मिळण्याचा बेत ठरविला; इतकेच नव्हे तर सलाबतखान अहमदनगर येथें येऊन दाखल होण्यापूर्वीच, गजवाष्यांतील व इतर सर्व निजामशाही फौज दौलताबाद येथें निघून जाऊन मिर्झाखान यास मिळाली; आणि सर्व मिळून शहाजादा मिरान-हुतेन यास बरोबर घेऊन ते अहमदनगर येथे येऊन दाखल झाले. त्यानंतर मिर्झाखान हा शहाजादा मिरान- हुसेन यासह शहरात येऊन राजवाड्याकडे गेला, त्यावेळी फेरिस्त्याकडे राजवाड्यांतील पाहरे कन्यावरील मुख्य अधिकान्याचे काम सोपविण्यात आलेले होते; ह्मणून त्याने या मंडळाचा राजवाड्यांत प्रवेश न होऊं देण्याबद्दल खटपट केली; परंतु शदाच्या पक्षाला इमानी फेरिश्ता, फितूरी फत्तेशहा फकीर व इतर फारच थोडी मंडळी असल्याने आणि उलटपक्षी शहाजादा मिरानदुसेन व मिर्झाखान यांच्या पक्षास राज्यांतील बहुतेक सर्व प्रमुख सरदार, सेनापति व चाळीस हजार सैन्य असल्याने शहाच्या पक्षाचा पूर्ण नाइलाज होऊन त्यास