विण्याची खटपट करीत आहे " असे त्याच्या मनात कोणी भरवून दिले; व त्यासही तें
सरें वाटून त्याने मिरान-दुरुन याला ठार मारण्याचा प्रयत्न आरंभिला, परंतु वजीरं सटायत-
खान यानें मिरानच्या संरक्षणाची अतिशय काळजी घेतल्यामुळे, या बाबतीतील शहाचे
सर्व प्रयत्न निष्फळ झाले. सलायतखानानें फत्तेशहास आपल्या हुकुमाप्रमाणे कंठ्या दिल्या
नाहीत, ह्मणून शहा आधीच त्याच्यावर रागावलेला होता; आपण स्वतः जडजवाहीर पाह
ण्याप्त मागितले त्यावेळी सलाबतखान यानें मौल्यवान् जवाहीर मार्गे ठेविलें, त्यामुळे त्या
रागांत भर पडली होती आणि प्रत्यक्ष आपला मुलगा मिरान हा आपल्या विरुद्ध असून
स्यासही आतां सलाबतखानाने आश्रय दिला आहे; ह्मणजे अंतस्थरीतीनें सलाबतखान
आपल्या विरुद्ध आहे, अशी शहाची खात्री होऊन तो सलाबतखानाचा सूड घेण्याच्या विचा
रास लागला; आणि तशी संधीही त्यास लवकरच प्राप्त झाली. त्याने सलाबतखानास-त्यानें
आपणांस न विचारितां इबाहीम आदिलशहा यास उद्भटपणाचा जचाच पाठविला असा आरोप ठेवून कामावरून दूर करून जुन्नर येथे प्रतिबंधांत ठेविलें; आणि कासामचंग हकीम यास आपला दिवाण ह्मणजे वसुली-खात्याचा मुख्य अधिकारी आणि मिर्झा महंमद तुर्की यास आपला मुख्य वजीर नमिलें. त्यानंतर आपला मुलगा मिरान याच्याविषयीं शहाच्या मनात आलेला विकल्प तात्पुरता दूर झाला; व पुढे विजापूरकराशीं तह होऊन मिरान हुसेन यांचे शहाजादी खुदांजा हिच्याशी मोठ्या थाटाने लम झालें; परंतु या गोष्टीस फारसा काळ लोटला नाहीं तोच पुन्हां शहास आपल्या मुलाविषयी संशय उत्पन्न झाला; व त्यानें त्याचा आपला मुलगा मिरानन्दुसेन याचा नाश करण्याचा निश्चय केला; तथापि बाह्यात्कारी तर्से काहीही न दाखवित त्याने दिवाण कासीम बेग ह्यास,माझा मुलगा मिरान हुसेन हा माझ्या सन्निध रहावा.अशी माझी इच्छा आहे; " असें हणुन त्यास आपणाजवळ आणून ठेवण्याविषयीं त्यास सांगितले. कासीम बेग यास, शहाचें हैं ह्मणणे खरे वाटले; शहाची पुन्हां आपल्या मुलावर प्रेमदृष्टी वळली, याबद्दल त्यास फार आनंद वाटला व त्याने मिशन-हुसेन यास शहाकडे किडयांत रवाना केले. त्यानंतर, तो किल्लयांत आल्यावर शहाने त्यास आपल्या खोली-जवळन राहण्यास जागा दिली; आणि रात्री तो निजला असता शहाने त्याच्या बिछान्यास आग लाविली; व बाहेर येऊन खोलीचें दार बंद करून तो आपल्या खोलीत निघून गेला; इकडे चिछाना व इतर वर्षे पेटल्यावर शहाजादा खडबडून उठला; व पेटलेली अंगावर्गल व फेंकून देऊन, त्याने दरवाजाकडे धांव मारिली; परंतु दरवाजा बाहेरून बंद असल्याचं त्यास आढकून आलें. तेव्हां त्याने मोठमोठ्याने आगेच्या मारण्यास सुरवात केली; परंतु कोणीही लवकर दार उपडण्यास आले नाही. इकडे खोलीत आग सारखी पसरत चालली होती; आणि कोंड-
लेला धूर व ज्वाळा, यामुळे गुदमरून जाऊन शहाजादा मरणप्राय स्थितीत येण्याच्या पंथास
पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/७९
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५२ )