मारिलें. इतक्यांत कमालखानाचा मुलगा सफ्तरखान यानें आपल्या बापाच्या वधामुळे चिडून जाऊन दंगा केला; परंतु याहीवेळीं राणीने स्वतः पुढे होऊन त्याच्याशी सामना केला; त्याचा पूर्णपणे पराभव करून व त्यात पकडून त्याचाही वध केला. त्यामुळे हैं अख्यान एकदाचे कायमचें समाप्त झालें. त्यानंतर दक्षिणी व हबशी लोकांना सैन्यांतून कमी करून त्यांच्याऐवजी त्या त्या ठिकाणी परदेशी लोकांची भरती करण्यात आली; सुनी पंथानुयायी मंडळींना ज्या मंडळीस कमालखानानें नेमिलें होतें त्यांना दरबारांतून काढून टाकण्यांत येऊन पूर्वीच्या जुन्या व अनुभवी शियापंथानुयायी लोकांना पुन्हां पूर्वीप्रमाणे
मयत आ; आणि आसदखान या नांवाच्या एका हुषार, इमानी व स्वामिनिष्ट मनुष्याच्या व आपल्या आईंच्या सल्ल्याने शहा राज्यकारभार करूं लागला. त्यामुळे राज्यां- तील व दरबारांतील सर्व अभ्यवस्था लवकरच नाहींशी होऊन राज्यकारभार सुरळीतपणें चालू लागला; त्याप्रमाणेच अदिलशाहीमधील ह्या भानगडी, घोटाळे व अंदाधुंदी यांचा फायदा घेऊन जमल्यास विजापूरचे राज्यही नामशेष करावें, अशा उद्देशानें बेदर, नगर व वन्हाड, येथील राज्यकर्त्यांनी एकमत करून त्या राज्यावर स्वारी केली होती; त्यावेळी त्या सर्वांना इस्माईल शहा यानें फोडून त्यांचा पूर्णपणें पराजय केला; त्यांना आपआपल्या ठिकाणी परत जाणे भाग पाडलें, आणि अशा रीतीनें शिया व सुनी यांच्यामधील भयंकर स्पर्धे- मुळे विजापूरच्या राज्यावर आलेले गंडांतर नाहींसें होऊन ते राज्य ह्या प्रसंगांतून सुरक्षित- पण बचावून जिवंत राहिलें.
याच राज्यांत अशाच प्रकारची दुप्तरोही एक गोष्ट घडून आलेली आहे; ती अशी कीं, सुलतान पहिला इब्राहीम अदिलशहा, ( कारकीर्द इ० सन १५३४ ते इ० सन १५५७)यानें राज्यकारभार हार्ती घेतल्यानंतर लागलीच सुनीपंथाचा स्वीकार केला; आणि आपल्या राज्यांनही शियापंथ मोडून सुनी पंथाची स्थापना केली; परंतु इब्राहीमशहाचा प्रसिद्ध शिया- पंथी वजीर आसदखान यास शहाचें हें धर्मांतर पसंत पडलें नाहीं, त्यामुळे त्या उभयतांमधील प्रेमभाव नष्ट झाला व त्यास कांहींसें वैमनस्याचे स्वरूप आलें. शिवाय शहाने आपल्या सैन्यां- तील शियापंथी परदेशी लोकांत नौकरींतून काढून टाकिलें त्यामुळे ते लोकही शहाविषयीं असंतुष्ट होऊन, त्यांनी अहमदनगर व विजयानगर येथें जाऊन तेथील राज्यकत्यांकडे नौकन्या पतकरिल्या. वजीर आसदखान हा जरी शहानें धर्मोत्तर केल्यामुळे त्याच्या त्या कृत्याबद्दल निषेध प्रदर्शित करणारांपैकी एक होता, आणि जरी त्यांचे व शहाचें मन परस्परांविषय कलुषित झालेलें होतें, तरी तो अत्यंत राजनिष्ठ आणि इमानी होता; आपण शहाच्या विरुद्ध खटपट करावी असें त्याच्या कधीही मनांत आलें नव्हते, इतकेच नाहीं तर - जरी त्याच्यावर अनेकवेळा शहाची इतराजी झाली होती तरी तो नेहमीं एकनिष्ठेनें वागून शहाचीच बाजू
६