साभाळून वागत होता. तथापि त्याच्याशी शहाचे वितुष्ट आले, ही बातमी बुन्हाण निजामशहा यास समजल्यावर त्याने या संधीचा फायदा करून घेण्याकरिता एक कारस्थान उभारिलें; आणि बेदरकर अमीर बेरीद याच्याशी सख्य करून " आसदखान हा आपणांस इब्राहीम आदिलशहाविरुद्ध गुप्तरीतीनें सामील आहे, त्यानें आपणा उभयतांस इब्राहीम शहाशी युद्ध करण्याकरितां विजापूरच्या राज्यांत बोलाविलें आहे आणि बु-हाणशहास त्याने या काम- गिरचिद्दल बेळगावचा किल्ला बक्षीस देण्याचें अभिवचन दिले आहे; " अशी खोटीच बातमी पसरविली. पुढे ही बातमी इयाहीम शहाच्या कानावर गेली; तेव्हां आसदखानाविषयीं त्याचें मन अतीशय कलुषित झालेले असल्यामुळे, त्याला ती खरीच आहे असें वाटलें, आसद- खान हा भयंकर कारस्थानी व कपटी मनुष्य आहे, असें त्याच्या मनानें घेतलें, तो दग्यानें आपला घात करील अशी त्याला भीति उत्पन्न झाली; आणि तो आसदखानाविषयीं अती- शयच सावध व साशंकपणानें वागूं लागला.
अशारीतीनें विजापूरच्या राज्यांत शहा व वजीर यांच्यामधील वैमनस्य परमा- वस गेलें आहे, असें वाटून बु-हाण निजामशहा यानें सोलापूरचा किल्ला आपल्या इस्तगत करून घेऊन बेळगाववर हल्ला केला; इतकेच नाही तर तो थेट विजापूरवरही चाल करून गेला; परंतु इब्राहीमशहाने वन्हाडकर इमादशहाची मदत घेऊन त्याचा पूर्ण मोड केला; अखेरीस सोलापूर व त्याखालील साडेपांच महाल बुन्हाणशहानें इब्राहीम अदिलशहास देऊन- त्याच्याशी तह केला व ही भानगड एकदांची अखेरीस निकालात आली.
विजापूरच्या अदिलशाही राज्याप्रमाणेच गोवळकोंडे येथील कुत्बशाही राज्यांतही भागडी झालेल्या आहेत. महंमदकुली कुत्बशहा यांच्या कारकीर्दीत ( कारकीर्द इ० सन . १५८० ते ३० सन १६११) दोन वेळां धार्मिक मतभेदामुळे अशाचप्रकारची धोक्याची राजकीय परिस्थिती उत्पन्न झाली; त्यांपैकी पहिल्यानें, ह्मणजे ६० सन १६०७ मध्ये व दुसऱ्यानें हणजे इ. सन १६०९ मध्ये होय; इ० सन १६०७ च्या सुमारास आया, दिल्ली, लाहोर वगैरे ठिकाणांहून पुष्कळ परदेशी मोंगललोक हैद्राबाद येथे येऊन राहिले होते; त्यापकी काही लोक परवानगी न घेता नौचद घाटावरील राजवाडे व बागबगीचे पाहण्यास गेले; त्यांतील बहुतेक मंडळी दारू पिऊन धुंद झालेली होती; हे लोक टेकडीवर चढून गेले; आणि तेथील खोजे पहारेकरी त्यांना राजवाड्यांत जाण्यास प्रतिबंध करीत असतो, त्यांना न जुमानितां ते तसेच अति घुसले; तेव्हा पहारेक-यांनी त्याबद्दल शहास वर्दी दिली शहाने तात्काळ शहरचा कोतवाल अल्ली आकादक्षिणी यास त्यांचा बंदोबस्त करण्याचा हुकूम दिला. त्यावेळीं अल्ली जाका यानें परदेशी लोकांविषयीं शहास खोट्या गोष्टी सांगून त्याचें मन त्यांच्याविषयीं कलुषित केलें. तेव्हा, "जे परदेशी मोंगललोंक