निजामशाहीप्रमाणेच अदिलशाही राज्यांतही या धार्मिक मतभेदामुळे अनेक भानगडी उपस्थित झाल्या; आणि अनेकवेळा राजकीय शांततेचा भंग होऊन निकराचे तंटेबखेडे व युद्धकलह माजून गेले. विजापूरच्या आदिलशाही राज्याचा संस्थापक अबुल - मुज्फर- युसफू अदिलशहा हा इ० सन १५१० मध्ये मृत्यू पावला, आणि त्याचा मुलगा सुलतान इस्माईल अदिलशहा हा गादीवर आला. सुलतान यूसफू हा शियापंथाचा असून त्यानें आपल्या कारकीर्दीत दरबारतिील अधिकारांच्या बहुतेक जागांवर आपल्याच पंथां- तील लोकांच्या नेमणुका केल्या होत्या; तथापि त्याचा मुख्य प्रधान कमालखान लेहेरी हा सुनीपंथाचा होता. सुलतान इस्माईल हा गादीवर आला, त्यावेळीं अज्ञान ह्मणजे फक्त नऊ वर्षांचा होता. त्यामुळे वजीर कमालखान हा जरी सुनीपंथाचा होता तरी, सुलतान युसफ् यानें त्यासच विश्वासपात्र समजून आपल्या मुलाचा - आपल्या मृत्यूनंतर- प्रतिपाळ करण्यास नेमिलें होतें, त्यामुळे इस्माईलच्या पोरसवदा कारकीर्दीत कमालखान हाच सर्वसत्ताधीश बनला होता. युसफूशहा जिवंत होता, तोपर्यंत त्याच्या दरान्यामुळे कमालखानास आपल्या सुनीपंथाची प्रगति करण्यास तिळमात्रही सवड मिळाली नाहीं; पण त्याच्या मृत्यूनंतर कमालखान हा सर्वसत्ताधीश बनल्यावर त्यानें आपला सुनीपंथ जोरांत आणण्यास सुरवात केली; त्याने दरबारांतील सर्व शियापंथी मंडळीस नोकरीतून कमी करून त्यांच्याजागी आपल्या सुनीथानुयायी मंडळींची भरती केली आणि सुलतान इस्माईल हा वयांत आल्या- वर आपल्या आणि आपल्या वडिलांच्या शियापंथाचा त्याग करून आपल्या इच्छेप्रमाणे सुनीपंथाचा स्वीकार करील, अशी त्यास खात्री वाटत असल्याने त्याने ह्या वेळेपासूनच तसे उद्योग करण्यास सुरवात केली होती; परंतु इस्माईलशहास कमालखानाचें हैं वर्तन आवडलें नाहीं. त्यामुळे परस्परांचीं मनें एकमेकांविषयीं अतीशय कलुषीत झाली; तेव्हां कमालखानानें आसपासच्या राज्यकर्त्यांना अनुकूळ करून घेऊन इस्माईल व त्याची आई या उभयतांना केद करून ठार मारावेंच आपणच राजगादी बळकवावी, असें कारस्थान उमारिलें; परंतु ही हकीकत शहाची आई बुबूजीखान हीस कळली. तेव्हा तिनें लागलींच या संकटांतून मुक्त होण्याची तजवीज केली; ही बाईं मोठी हुपार, शूर, धोरणी व राजकारणकुशल असून सी मुकुंदराव या नांवाच्या एका मराठे सरदाराची बहीण होती; आणि तिच्यावर युसफू आदिलशहाचे अतीशय प्रेम असून, तिच्याठायीं विशेष कर्तृत्वशक्ति वसत असल्याचेंही त्यास माहीत होते; तिनें कमालखानास कोणत्याही प्रकारें हार न जाता, उलट त्याचा प्रयत्न हाणून पाडून त्यासच नामशेष करण्याचा निश्चय केला, युसकतुर्क या नांवाच्या एका शूर बलिष्ट सरदारास मोठ्या गुप्तपणानें आपल्या पक्षांत मिळवून घेतले; आणि त्याच्या मदतीने मोठ्या युक्तीनें व हिंमतीने कमालखानास आणि त्याच्या सर्व साथीदारांस पकडून त्यांना ठार
पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/६७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४०)