स्यांचा निकाल उडविला; पण " गाजी " या शब्दाचा " यशस्वी " असाही एक अर्थ असून, त्याप्रमाणें ह्मणावयाचें ह्मणजे त्याची कारकीर्द यशस्वीपणाची झाली नाहीं, आणि प्रत्येक बाबतीत अतिरेक होऊन त्याने राज्यनाशाची पूर्वतयारी करून ठेविली, अर्सेच ह्मणर्णे प्राप्त होते; कारण अवरंगज्ञेचाच्या मृत्यूनंतर लवकरच मोंगल साम्राज्याचे तुकडे पडले; आणि वास्तवीकरीत्या आपल्या हातांतील बाहुल्याप्रमाणें नाचवितां येण्याइतपत निःसत्व, निर्बल व नामधारी बनलेल्या बादशहाला योग्य मानमरातब देण्याचें बेगडी प्रदर्शन करून व " फिदवी - बादशाहे - गाजी " असे शिक्के करून अनेक सरदारांनी आपआपली स्वतंत्र राज्य निर्माण केली; आणि सरतेशेवटीं नष्ट ऐश्वर्याच्या अवशिष्ट वैभषांत अस्तित्वांत असलेलें मोगल साम्राज्यही नष्ट होऊन गेलें.
हिंदुस्थानावर इ० सन १७३८-३९ या वर्षी स्वारी करणारा प्रसिद्ध धाडसी, शूर पण तितकाच निर्दय सेनानायक नादीर कुली ऊर्फ नादीरशहा हा अवरंगझेचाप्रमाणेच शियापंथाचा कट्टा शत्रू होता. त्यानें इ० सन १७३६ मध्ये इराणचा शहा तहमा पदभ्रष्ट करून, पूर्णपणे शियापंथी असलेलें इराणचे राज्य आपल्या ताब्यांत घेतलें; व तेथील बहुतेक लोकांना त्यानें सक्तीनें सुनीपंथाचा स्वीकार करण्यास भाग पाडिलें, शिवाय तो इतका क्रूर होता की, शियापंथी इराणी लोकांशी तर अतीशय कठोरपणानें वागून, त्यानें त्यांची “ ना धर्ना, ना त्राता, " अशी भणंग स्थिति तर करून सोडिली होतीच; पण प्रत्यक्ष आपल्या एका शूर मुलाचेच डोळे काढवून त्यास जन्मधि व मृतवत् स्थितींत आणून
१ टीप:- " फिदवी - बादशाहे गाजी " याचा अर्थ खालीलप्रमाणे आहे; तो:-फिदवी ह्मणजे गुलाम किंवा बंदा नोकर; बादशहा ह्मणजे राजा, आणि गाजी ह्मणजे यशस्वी; ह्मणजे यशस्वी राजाचा गुलाम; या बाबतींत लोकहितवादीच्या शब्दांत ह्मणावयाचें ह्मणजे, दिल्लीचे जे सरदार पुढे स्वतंत्र राजे व नबाब झाले, त्यांनीं जे शिक्के केले होते, त्यांजवर वरील अक्षरें कोरली होती; व त्यांवरून ते, " आह्मी दिल्लीच्या यादशहाच्या हुकुमानें त्याचे नौकर ह्मणून आपआपलीं राज्यें करितों, " असें दर्शवीत होते; परंतु हा केवळ बाहेरचा देखावा होता. मराठी राज्याचे तुकडे होऊन जीं निरनिराळीं राज्य निर्माण झाली, त्यांतही पहिल्याने, " शाहू चरणीं तत्पर " असा शिक्काच चोहोंकडे वापरत असत, परंतु ही तत्परता शिक्यांतच काय ती राहिली होती. पहिल्याने ती तत्परता सर्वांनी आपल्या रुतींत दाखविली; परंतु पुढे त्या तत्परतेचें केवळ ढोंग होऊन, ती शब्दशेष मात्र झाली | सातारा, कोल्हापूर, वगैरे लुटून आणावीं; आणि " शाहूचरणीं तत्पर" हे शिक्के वापरावे ! ह्मणजे त्या शिक्यांत किती सद्धेतू होता, तो उघड दिसतो ! हीच अवस्था दिल्लीच्या बादशाहीची झाली होती !!