Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २९ )

टाकिलें होतें ! अखेरीस त्याच्या या दुष्ट स्वभावास सर्वच लोक कंटाळले; आणि एका अफगाण सरदाराने त्याचा इ० सन १७४७ मध्यें खून केला; त्यामुळे इराणमधील लोक त्याच्या त्रासांतून व शिया धर्माविरुद्धच्या त्याच्या छळांतून कायमचे मुक्त झाले.

 औंधच्या उत्तरेकडील सरहद्दीवर हिमालय पर्वताची ओळ, गंगा नदीचा वरील भाग, यांच्या कोनांत " रोहिलखंड " या नांवाचा एक मोठा सुपीक व महत्वाचा प्रदेश असून तो पूर्वी अफगाणिस्थानांतील सुनांपंथाच्या अफगाण " किंवा " रोहिले लोकांच्या ताब्यांत होता. या रोहिले लोकांनों मोंगल बादशहा जहीरुद्दीन महंमद बायर यास त्याच्या राज्यसंस्थापनेत व वृद्धींत मदत केल्यामुळे त्यानें तो त्यांनां तोडून दिला होता, पुढे बादशहा महंमदशहा याच्या कारकीर्दीत इ० सन १७४४ मध्ये ते स्वतंत्र झाले. या रोहिलखंडाच्या राज्यास लागूनच औंधचें राज्य होतें; व तेथील राज्यकर्ता " वजीर शियापंथी होता, त्यामुळे रोहिले व वजीर या उभयतांमध्यें नेहमींचेंच वांकडे असून सतत युद्धकलह व निरनिराळ्या भानगडी उपस्थित होत असत; पुढे औंधच्या वजिरानें (सफ्- तरजंग ) शिंदे, होळकर व भरतपूरकर, सुरजमल जाट यांची मदत घेऊन रोहिल्यांचा पुष्कळ नाश केला; आणि पुढील काळांत, इ० सन १७७४ मध्यें, औधचा बजीर ऊर्फ नवाब- सुजाउद्दौला व इंग्रज या उभयतांनी मिळून रोहिले लोकांवर स्वारी केली, त्यावेळी रोहिले लोकही या दोस्त सैन्याबरोबर मोठ्या शौर्याने लढले, परंतु अखेरीस रोहिले लोकांचा पूर्ण पराभव होऊन, त्यांचा सरदार हाफीज रहिमतखान हा मारला गेला व रोहिलखंडांतील अफगाण सरदार मंडळाची अल्पायुषी सत्ता पूर्णपणे नष्ट होऊन गेली.

_____