त्रासाचा सूड पूर्णपणे उगवून घेतला, तथापि स्वतः आपण नामानिराळें राहून कासमखाना
मार्फत त्यानें हैं कृत्य करविलें; कासमखानानें अफगाणी लोकांचा विश्वास पूर्णपणे संपादन
केल्यानंतर पेशावर थेथें आपल्या वडील मुलाची सुंता करण्याचा एक मोठा समारंभ केला,व त्याप्रसंगी बहुतेक सर्व लहानमोठ्या अफगाण सरदारांना त्याने तेथें बोलावून घेतलें;नंतर एकेदिवशी रात्री, मेजवानी चालू असता, अगाऊ ठरविल्याप्रमाणे, फळ चिरतांना बोट कांपल्याचें निमित्त करून कासमखान मेजवानींतून उठून बाहेर आला; आणि हीच इशारत समजून अफगाण लोकांची एकदम कापाकापी सुरू झाली; या कत्तलींतून कोणीही जिवंत राहूं नये, असा कासमखानानें अगाऊच कडेकोट बंदोबस्त केला असल्यामुळे बहुतेक सर्व अफगाण सरदारमंडळी ठार मारिली गेली; आणि अफगाणी लोकांत सर्वत्र दुःख, उदासीनता व भोति यांची छाया पसरून ते निमूटपणें अवरंगतेयाच्या वर्चस्वाच्या आधन झाले !
अफगाण लोकांच्या या कत्तलीत अवरंगझेबानें कोणत्याही प्रकारे प्रत्यक्षपणे भाग
घेतला नाहीं, इतकेच नव्हे तर त्याने कासमखानाच्या ह्या अघोर कृत्याबद्दल आपली पूर्ण-
पर्ने नापसंती दाखवून व त्याच्यावर इतराजी करून त्यास परत बोलावून घेऊन, कामावरूनही दूर केलें, ही गोष्ट अगदी सत्य आहे, आणि त्याच्या ह्या " सारवणी" वर्तनावरून या बाबतींत अवरंगझेच पूर्णपणे निर्दोषी आहे, असे वाटण्याचा संभव आहे; परंतु एकंदर परिस्थिति लक्षात घेतां तोच या घोर कृत्यास मूळ, अंतस्थ रीतीनें कारणीभूत असावा, असेच ह्मणणे सयुक्तिक दिसत आहे. कारण अवरंगझेबाचा आपल्या ठिकठिकाणच्या सर्व स्थानिक अधि कान्यवर व प्रांतिक सुभेदार- सरदार वगैरे मंडळीवर किती विलक्षण दरारा होता, कारण त्याची व्यवस्था, शिस्त व अंमलबजावणी अतीशय कठोर होती; — हैं लक्षात घेसां कासम- खानाने औरंगक्षेचाचा अगाऊ विचार घेतल्याशिवाय है कृत्य केले असेल असें बिलकूल संभवत नाहीं, अवरंगझेच हा हुकुनांची व नियमांची अंमलबजावणी अत्यंत कसोशीनें करीत असे, नियन अथवा हुकूम मोडणारांची, मग तो कोणीही मोठा अथवा त्याच्या प्रेमांतील असो, तो कधीही उपेक्षा करीत नसे; “ एक नियम मोडूं दिला की लागलींच लोक सर्वच नियम मोडूं लागतात; "अ तो लगत असे; त्याच्या स्वदस्तूरच्या हुकुमाशिवाय राज्यभर कार्डीझुद्धा हालत नसे; परगी एवाया लहानशा अंमलदाराची अथवा कारकुनाची नेमणूक- निवड, ह्रीं कामे सुद्धा तो स्वतःच करीत असे; आणि आपले कामगार कसा कार-भार चालवितात, याचा नेहमीं तो पूर्ण तपास ठेवीत असे; ह्या सर्व गोष्टी विचारात घेतल्या ह्मणजे, एवढे मोठें अघोर कृत्य, औरंगक्षेचाच्या संमती व परवानगीशिवाय करण्याची कासम-खानास कधीही हिम्मत झाली असेल, असे बिलकूल ह्मणवत नाहीं; शिवाय अवरंगशचाचा