Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२५)

कदाचित आपल्या प्रदेशावर स्वारी करण्याचा विचार असेल असें समजून, कंदाहारच्या आसपास आपली फौज जमविली; परंतु अवरंगशेच हा स्वतः हिंदुस्थानांतच निरनिराळ्या भानगडीत गुरफटला गेला असल्यामुळे, शहाबरोबर आणखी एक नवी भानगड उपस्थित करण्याची त्याची इच्छा नव्हती; ह्मणून शहास खुब करून, तिकडील संकट टाळण्याकरिता आपल्या वकिलाचरोबर मौल्यवान् नजराणे देऊन त्यांना त्याच्याकडे पाठविले; परंतु अवरंगझेबानें शिया धर्माविरुद्ध चालविलेल्या मोहिमेमुळे शहा अतीशय संतापून गेलेला होता; त्यामुळे त्याने भरदुरबारात अवरंगझेबाच्या वकिलाचा एक शब्दही ऐकून न घेता, त्याचा अतीशय अपमान केला; अवरंगझेबाने पाठविलेल्या नजराण्यांचा स्वतः स्वीकार न करितां त्याने ते दरबारातील मंडळीस वांटून दिले; अवरंगशेचाचा ढोंगीपणा व पितृद्रोह याबद्दल त्याची उबड उधड निर्मत्सना केली; आपल्या नाण्यावर 66 आलमगीर " ( ह्मणजे जगज्जेता, किंवा जग जिंकणारा ) ही अक्षरें खोदविल्याबद्दल त्याची थट्टा उडविली; शेवटच्या भेटींत शहाच्या एका नौकरानें त्याच्या वकिलाच्या दाढीस आग लाविली; " हिंमत असेल तर काबूलकडे येऊन आमच्याबरोबर युद्ध करा; " असा सणसणीत निरोप त्या वकिला- बरोबर अवरंगजेबाकडे पाठवून शहानें त्यास परत जाण्यास रजा दिली; आणि मोठ्या धडाक्यानें आपल्या सैन्यासह तो अफगाणिस्थानांत येऊन दाखल झाला; तेव्हां अवरंगझेब मनांत तर अतीशयच घाबरला; परंतु तसें वर न दाखवितां उलट शहाकडून अपमान सोसून परत आलेल्या आपल्या वकिलावरच तो अतीशय संतापला; " तुझी शहाचा तेथल्या तेथेंच खून का केला नाहीं ! " असें ह्मणून त्यास सर्पदंश करवून ताबडतो ठार मारविलें आणि बाह्यात्कारी आपल्या फौजेची मोठी तयारी करून शहाशी टक्कर देण्याचा त्यानें आविर्भाव आणिला; परंतु इतक्यांतच शहा अब्यास हा एकाएकी आजारी पडून मृत्यु पावला, त्यामुळे सुदैवानें अनायासेंच या एका बलिष्ट व शूर शत्रूच्या भीति- पासून अवरंगझेच पूर्णपणे मुक्त झाला.

 त्यानंतर शिवाधर्मी अफगाण लोकांचा अरंगझेबाने सारखा छळ आरंभिल्यामुळे त्यांनी अफगाणिस्थानांत एक मोठे बंड उभारिले; आणि तो बंडावा देशभर पसरून अवरंगझेबाची राजकीय परिस्थिती पुन्हा धोक्याची झाली; अफगाण लोक मोठे कडवे शूर, व कटून मरणारे, पण न हटणारे असल्यामुळे, त्यांच्याशी युद्ध करून त्यांना नामशेष करणें ही गोष्ट आपल्या आटोक्याबाहेरची आहे, अशी अवरंगझेबाची खात्री झाली; तेव्हां त्यानें- कपटनीतीचे अवलंबन केले; कासमखान या नांवाच्या एका सरदारामार्फत त्यानें अफगाण सरदाराशीं वरपांगीं सख्य केलें, अफगाण लोकांवरील कर माफ करून व अशाच प्रकारच्या इतर कित्येक गोष्टी करून, त्यानें त्या लोकांमध्ये आपणाविषयीं विश्वास उत्पन्न केला व कपटजाल पसरून व त्यांत त्यांना अडकावून अवरंगदेवाने त्यांनी त्यास दिलेल्या