ताबडतोब प्रतिबंधांतून मुक्त करावें, नाहीं तर आह्मी तुझाबरोबर युद्ध करण्यास तिकडे चाल करून येऊं " असें त्यास कळविलें; यावेळी औरंगझेयाची राजकीय स्थिति विशेष धोक्याची झाली होती, शिवाय तो स्वत:ही अतीशय आजारी असून, जगतो का भरतो, इतकी त्याची प्रकृति खालावलेली होती, त्यामुळे काश्मीरमध्यें हवाफेर करण्याकरितां जाणें त्यास अत्यावश्यक होते व त्याचा तिकडे जाण्याचा विचारही होता; उलटपक्षी, शहाजहान जिवंत असल्यामुळे, आणि रजपूत व शियाधर्मी सरदारांशी त्यानें पैर संपादन केलें असल्यामुळे, ते शहाजहानच्या पक्षाचे होऊन, आपण काश्मीरमध्ये गेल्यास, पदभ्रष्ट होऊं,अशी त्यास मीति होती;—लणजे " शहाजहानचे अस्तित्व " हीच त्यास मुख्य भीतीची विवंचना होती; ह्मणून त्यानें, या पाषाणहृदयी मनुष्यानें आपल्या असुरी धुंदीच्या उन्मादोत शहाजहान यासच जगांतून नष्ट करावे, असें ठरविलें ! आणि हा विचार त्यानें आपल्या मुलीस कळविला || परंतु औरंगझेबाची ही घोर-महा घोर, महा दुष्ट, महा नीच, महा क्रूरकर्मी मसलत त्या मुलीस पसंत पडली नाहीं; व तिनें या कृत्यास प्रवर्तक होण्याचें साफ नाकारिलें, तेव्हां अवरंगझेबानें शहाजहानच्या वैद्यामांकत, आपल्या बापाचा नाश करण्या- करत पाठविलें, परंतु तो वैद्य राजघराण्यातील पुरातन व इमानी असल्यामुळे, शहाजहान यास विषप्रयोग करण्याची त्याची बिलकुल इच्छा नव्हती, पण इकडे अवरंग- झेचास तसे स्पष्ट सांगून आपले धिंडवडे करून घेण्याचीही त्याची तयारी नव्हती; ह्मणून त्याने स्वतःच ते वीष प्राशन करून घेऊन तो मरून गेला 1 तेव्हां नाइलाजाने शहाजहान यास जिवंत ठेवूनच त्यास काश्मीरकडे जावे लागले; तथापि तिकडे जातांना त्यानें आपणांबरोबर मोडी फोन घेतली, तेव्हां तिकडे शहा अब्यास यानेंही, अवरंगझेचाचा
१ टोपः - आपल्या बापाविरुद्ध फुटून निघून बंड करण्याचा सांप्रदाय सलीम
ऊर्फ जहांगीर यानें प्रथम निर्माण केला व अकबराविरुद्ध त्यानें बंड केलें ! पुढे
जहांगीरच्या विरुद्ध शहाजहान यानें बंड केलें; पण जहांगीरप्रमाणेच त्याच्याही बंडाचा
बोजवारा उडून त्यालाही आपल्या वडिलाची क्षमा मागावी लागली; शहाजहान जहांगीरला
शरण गेला; तेव्हा पुढे चांगली वर्तणूक ठेवण्याबद्दल द्वारा व औरंगझेब हे शहाजहानचे
दोन मुलगे, जहांगीर यानें “ ओलीस " ह्मणून आपणांजवळ लाहोर येथें ठेवून घेतले; ते तेथें राणी नूरजहान हिच्या ताब्यात होते, पुढे जहांगीर वारल्यावर शहाजहान हा आग्रा येथें
येऊन सिंहासनारूढ झाला; तेव्हा नूरजहानचा भाऊ आसफखान-याची मुलगी मुम्ताज-
महल ही शहाजहान याची बायको व द्वारा, औरंगझेब वगैरे चौदा मुलांची आई होती;-
यानें, त्यांना आग्रा येथें आगून शहाजहानच्या स्वाधीन केले, आणि हाच सांप्रदाय पुढे
औरंगज्ञेय व त्याच्या चिरंजिवांनीही चालू ठेविळा ! !