व त्याच्या नावाने "त्या" वाचण्याचे नाकारिले. त्याप्रमाणेच त्यानें आपल्या वकिला- बरोबर मक्का येथील धर्माध्यक्षाकडे दुष्काळ संपत्ति च नजराणे पाठविले; परंतु त्यानेही त्यांचा विकार न करितो व त्यास " बादशहा " असे कबूल न करितां त्याच्या वकिलास तसेंच परत पाठवून दिले. इतकेच नव्हे तर, " शहाजहानशिवाय हिंदुस्थानच्या दुसन्या बादशहास आपण ओळखीत नाहीं " असे त्याने यात्रेकरूंना जाहीर केले. अशारीतीनें गादीवर आल्यानंतर लागलीच त्यास मानभंग व अपमान सहन करण्याचा प्रसंग आला. दिल्ली येथील काजीचे नुकसान करणे त्याच्या हातचें होतें; त्याप्रमाणे त्याने दिल्लीतील सर्व मुल्लो मंडळीस बोलावून घेऊन त्यांच्यासमक्ष त्या काजर्सि कामावरून करून दुसन्या काजीची त्यांच्या जागी नेमणूक केली व इ० सन १६६० च्या आक्टोबर महिन्यापासून अवरंगझे- याच्या नावानें खुला वाचण्यास सुरवात झाली; परंतु या प्रसंगांतून तो निभावला तों त्याच्या सुनीपंथावरील प्रेमामुळे अथवा शियावेमीवरील उग्र स्वरूपांच्या कटाक्षामुळे एका निराळ्याच दिशेने त्याच्यावर आपत्ति कोसळण्याची चिन्हें दिसूं लागली. व तें संकट करें टाळावें, या विवंचनेत काही काळ मन होण्याचा त्याच्यावर प्रसंग ओढवला !
औरंगझेबाची अचोर कृत्ये व शियाधर्माच्या बाबतीतील त्याची कंठोर करण, ही इराणची शिया पंथी शहा दुसरा अभ्यास यास बिलकुल पसंत न पडल्यामुळे त्यानें अवरंग- सैवाकडे आपले एक वकीलमंडळ पाठविलें, आणि त्यांच्या मार्फत “ शहाजहान यास
१ टीप:- मुसलमानांत " मुला "" काजी " हे दोन अधिकारी त्यांच्या वस्ती- मध्ये असतात. मुल्ला या नांवाच्या अधिकान्याकडे जनावरे मारण्याचे काम असतें. यकरी, कोंच बगैरे जनावरें झटक्याने अथवा बुक्क्यांनी कुंचलून मारणे गैर असल्यानें, शास्त्र- विधीनें व देवाचें नांव घेऊन जनावरांचा जीव घेणारा " मुल्ला " या नांवाचा एक स्वतंत्र अधिकारी नेमिलेला असतो, आणि मुल्लाच्या हातानें न मारिलेलें जनावर खाण्यास योग्य तें अपवित्र गजे " हराम नसून 42 नापाक " असें समजलें जातें; व शास्त्रविधीनें व ईश्वराचे नाव घेऊन मुखानें मारिलेले जनावर खाण्यास योग्य, ह्मणजे "हलाल 'पाक' ( पवित्र किंवा शुद्ध ) मानण्यांत येते.
२ " काजी " या नांवाच्या अधिकान्याकडे, लममुहूर्त लावणें किंवा तोडणे, सणवार वगेरेंचे शास्त्रार्थं सांगणे वगैरे धर्मसंबंधी व न्यायाची कामे सोपविलेली असतात.
३ मुसलमानांत जो राज्यकर्ता गादीवर असेल त्याच्या नांवानें त्याचें व त्याच्या कुंटुंबाचे कल्याण व्हावे, हणून मशीदीत काजी प्रार्थना करितात, त्यास "सुत्वा " म झणतात.