अवरंगतेय बादशहाची कारकीर्द, राजकीय यायतीत ज्याप्रमाणे महत्वाची आहे,
त्याप्रमाणेच ती धार्मिक बाबतींतही आहे. त्यानें राजकीय वातावरणांत ज्याप्रमाणे मोठ्या
जोराची खळबळ उडवून दिली, त्याप्रमाणेच ती धार्मिक वातावरणांतही उडवून दिलेली
आहे; राजकीयप्रमाणेच धार्मिक वातावरणही क्षुब्ध होऊन त्यास धार्मिक शत्रूही उत्पन्न
झाले आहेत आणि राजकीयप्रमाणेच त्याच्या धार्मिक बाबतींतील आचरणाचा पूर्णपणे
बोजवारा उडाला आहे! धर्मसंबंधीं दुराग्रहाचे हृदृ तडीस नेतांना, राज्य गेलें तरी हरकत
नाहीं, कितीही त्रास झाला तरी फिकीर नाहीं, कितीही अडथळे खाले तरी गुमान नाहीं;
प्रत्यक्ष प्राण गेला तरी पर्वा नाहीं; इतक्या परमावधीस त्याच्या मनोवृत्ति गेलेल्या असल्या-
मुळे त्याला आपले हट्ट तडीस नेतांना, कोणत्याच यायतींचा विचार करण्याचें मुळीं कारणच
रहात नव्हते, आणि तसा विचार त्यानें केलाही नाहीं; अवरंगझेच हा हिंदुधर्माचा द्वेष्टा होता,
रजपुतांचा बेरी होता व उभयतांनाही नामशेष करण्याचा त्याने अट्टाहास केला होता;
तथापि त्याबरोबरच तो स्वजातीय पण भिन्नपंथीय लोकांचाही द्वेष्टा होता;-लणजे
स्वधर्मातील मतमतांतरावरही त्याचा कटाक्ष होता व त्यांचाही मराठे व रजपूत यांच्याप्रमा
णेंच-समूळ उच्छेद करण्याच्या खटपटीस तो लागला होता है लक्षात ठेविलें पाहिजे.
अवरंगतेचाची ही धार्मिक प्रवृत्ति त्याच्या कावेबाज स्वभावाप्रमाणेच तो
गादीवर येण्यापूर्वीही दिसून आली होती. इ० सन १६६५ मध्ये मीरजुम्ला यानें
गोवळकोंडे येथील शियाधर्मी कुत्बशाही राज्यावर स्वारी करण्याविषयीं त्यास कळविलें;
तेव्हां त्या राज्याचा व त्याचरोबरच शियाधर्माचा पाडाव करण्याची संधी मिळाल्याबद्दल
त्यास अतीशय आनंद झाला; व त्याने त्याच वर्षी तिकडे स्वारही केली; परंतु शहाजहान
याने त्यास परत बोलाविल्यामुळेच हें राज्य व तेथील राज्यकर्ता सुदैवाने त्यांच्या
तडाक्यांतून यावेळी बचावले; पुढे शहाजहान याच्या चारी मुलांत दारा, सुजा,
अवरंगझेच आणि मुराद या चार भावाभावांत - राज्यप्राप्तीकरितां सुरूं झालेल्या यादवीतही
शिया व सुनी या मतभेदाचें उम्र स्वरूप दृग्गोचर झालें. दाराच्या तर्फे सुजाशी युद्ध
करण्यास त्याचा वडील मुलगा सुलेमान यास त्यानें पाठविले. या फौजेत सुनी धर्मि
यांचा विशेष भरणा होता. उलटपक्षी सुजा याच्या फौजेंत शियाधर्मियांचा विशेष भरणा
होता. त्यामुळे सुजाच्या शियाधर्मीय लोकांर्शी केव्हा एकदा आपण युद्ध
करूं व त्यांचा नाश उडवूं, असें सुलेमानच्या सैन्यांतील सुनी धर्मीया
होऊन गेलें होतें, व त्याप्रमाणे त्यांनीं भयंकर चुरशीनें युद्ध करून व
सुजा याचा ता० १४ फेब्रुवारी ३० सन १६५८ रोजी बनारस ऊर्फ काशी या शहरा-
समोरील बहादरपूर या गांवीं- पूर्णपणे पराभव करून त्यास बंगाल प्रांतति पळवून लाविलें.
इकडे अवरंग सेवानें सुजा व द्वारा विरुद्ध मूर्ख मुराद याला आपल्या पक्षाकडे वळवून