Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२९)

भेटला त्याच्याशी गोड बोलून आणि आपल्या गळ्यातील मोत्याचा हार त्याच्या गळ्यांत घालून, न्याला अशी कांहीं भुरळ पाहिली कीं, तो आपला पूर्वीचा सर्व बेत सोडून अवरंगतेबाच्या पक्षास वळला; त्याची आज्ञा उठविण्यास तयार झाला व अवरंगचानें व्यास लाहोर येथे सुभेदार नेमून निकडील बंदोबस्त करण्यास पाठवून दिलें, लणजे मवरंगझेबाची हिंमत, धाडस, शोर्य आणि धोरणी स्वभाव यांचे स्वरूप थोडक्यांत वर लिहिल्याप्रमाणे आहे. त्याच्या स्वभावांतील इतर वैशिष्य पाहता त्याने पुष्कळवेळां अविचार व निर्दयपणाही केला आहे; तथापि सुद्धा वाटणार नाही इतका शांतप्रणा आपला कदाचित् प्रागचात होईल अशा प्रसंगी त्यानें स्वीकारिल्याचे उदाहरण आहे; अकबराहून अवरंगशेष जास्त क्रूर होता, असा लोकांचा सामान्य समज आहे; परंतु बादशाहो तख्न मिळविण्याच्या व धर्मसंस्थापना करण्याच्या मार्गात जे जे प्रतिस्पर्धी पुढे आले, त्या त्या सर्वांचा अवरंगझेबानें साफ निकाल उडविला. ही बाबत बाजूस ठेविली लणजे उगाच लहरीखातर त्यावें लोकांचे प्राण घेतल्याचे एकही उदाहरण घडलेलें नाहीं, उलटपक्षी जरूरीहून कमीच शिक्षा तो देत असे; खापीखान ह्मणतो :- " अवरंगझेच हा अपराधाच्या मानानें कमां शिक्षा देण्यांत अस्थानी दया दाखवीत असल्यामुळेच त्याच्या राज्यांत अभ्यवस्था माजली. " बादशहा अवरंगझेब हा ज्या खोलीत निजत असे, तिच्याच खालच्या मजलपति एकदा चुकानें नोकरांच्या हातून बंदुकीची दारू ठेविली गेली । ही गोष्ट अवरंगझेयास कळल्यावर तो शांतपणार्ने फक्त एवढेच ह्मणाला की, "जर जहाँगीरसमोर असा प्रकार घडला असता, तर त्याच दारूवर त्यानें तुह्मांस बसवून लागलींच उडवून दिलें असतें. "- ह्मणजे नौकराच्या एवढ्या भयंकर चुकीबद्दलही त्याने फक्त 56 ह्मणण्या " पलीकडे काहीही केले नाहीं !- अकचगचा स्वभाव जात्याच र होता, तथापि सारासार विचारानें तो पुढे पुष्कळ नरम पडला. आपणास अप्रीय असलेल्या लोकांना आपल्या मेटीस बोलावून त्यांच्याकडून वीष घातलेले विडे सावविर्णे, गर्भाची वाढ तपासण्यासाठी गर्भवति खियांचीं पोटें चिरणें, मुलांची उपजतबुद्धि पाहण्या- करितां त्यांना एकांसवासांत कोंडून कायमची मुकीं बनविणे, हे अकबराचे प्रकार शाखाच्या नावाखाली सुद्धा क्षम्य नाहींत; अकबर हा न्यायाच्या कामात आपपर बिलकुल लक्षांत आणीत नाहीं,सर्वांना सारख्याच रीतीनें वागवितो- असें अबुलफज्ल वारंवार लिहितो; पण प्रत्यक्ष त्याचाच खून जहांगारने केला, अशी अकबराची खात्री झाल्यावर त्यानें मुलास कोणती शिक्षा केली 1" ( Beveridges Articeles on Akbar, Phe Indian world, 1905-06 ) - लणजे कांहीं बाबतींत अवरंगच अकबराहूनही श्रेष्ठ होता, असें झप्पतां येईल; पण त्याचा अगम्य व अति शहाणा स्वभाव त्याला ठिकठिकाणी नहून, अखेरीस त्याचा आणि मोंगली साम्राज्याचा पूर्णपणे बोजवारा उग्रळा।