Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२१)

उद्योग आरंभिला; त्यावेळी त्यानें मुरादजवळ सुनीधर्माचीच महती वर्णन केली, सुजा हा पाखंडी आहे; इराणचा शियाधर्म त्याला आवडतो; परंतु सन्या मुसलमानी- धर्माचा गजे अवरंगझेबाच्या मताप्रमाणें सुनीधर्माचा अभिमान तुझास एकट्यासच काय तो आहे " असे त्यास कळवून राज्यप्राप्तीच्या ध्येयांतही त्याने मोठ्या अभिमानानें आपल्या सुनीधर्माची थोरवी पुढे आणिलेली आहे | तथापि मतलची अवरंगझेबाच्या जाळ्यांत मूर्ख व मतिहीन मुराद फसला जाऊन तो अवरंगझेचास मिळाला त्यानंतर ते उभयतां दिल्लीवर चाल करून आले; आणि सुजायरोबरील युद्धांत धार्मिक द्वेषाचा फायदा जसा द्वारा सुलेमान यांस बहादरपूर येथे मिळाला, तसाच तो दाराविरुद्ध यावेळी अवरंगझेब-मुराद यांना मिळाला. अवरंगझेच हा मुरादसह दिल्लांवर चाल करून येत आहे, असें द्वारा यास कळल्यावर त्यानें जसवंत सिंह यांस रजबूत सैन्याचें, आणि कासीम खान यास मुसलमानां सैन्याचें, आधिपत्य देऊन त्यांना अवरंगझेचावर पाठविलें; परंतु कासीमखानाचें मन अगोदर पासूनच दाराविषयों शुद्ध नव्हतें. शिवाय तो स्वतः सुनीधर्मीय असल्यामुळे, औरंगझेया बरोबराल सुनी सैन्याशीं युद्ध करण्यास उत्सुक नव्हता; इतकेंच नाही तर सुनी अवस आपण जाऊन मिळावे अशी त्याची अंतस्थ इच्छा होती. त्यामुळे अवरंगझेच हा मुरादसह मांडवगडाहून उज्जयनी येथे येत असता त्यात कासीमखानाने जाणूनबुजून मार्गातील खिंडीत अडवून धरिलें नाहीं; त्यामुळे ते ती खिंड ओलांडून सहजरीत्या अलीकडे आले.त्यानंतरही पुन्हा त्यानें अवरंगझेचाच्या सैन्यास विश्रांती मिळून तें ताजेतवानें होण्यास सवड दिली, व पुढे उज्जयनीच्या दक्षिणेस दहा मैलांवर धरमतपूर गांवाजवळ ता० १५ एप्रील इ० सन १६५८ रोजीं उभयतांच्या सैन्यामध्ये युद्ध सुरू झाले, त्यावेळीं, ऐन युद्धप्रसंग,कासीमखानानें माघार घेतली व एकट्या जसवंत सिंहाच्या रजपूत सैन्यावर युद्धाचा सर्व भार येऊन पडला आणि त्याची स्थिति मोठा धोक्याचा झाली. तथापि जसवंतसिंह व त्याचें रजपूत सैन्य, न डगमगता त्यांनी मोठ्या निकरानें युद्ध प्रसंग केला; त्यांत पुष्कळ रजपूत सैन्य, कटून मृत्यू पावलें, जसवंतसिंह मोठ्या धडाडानें शत्रुसैन्याची फळी फोडून जोधपूरकडे निघून गेला; आणि अवरंगसेच विजयी होऊन व त्यास पुष्कळ युद्धसामुग्री व इतरही सामान मिळून त्याचा अतीशय फायदा झाला. पुढे अवरंगचानें आपा शहराच्या दक्षिणेस चंबळा नदीवरील सामूगड ऊर्फ फरयाबाद येथील युद्धांत, ता० २९ मे इ० सन


 १ टीप:- कश्याबाद ऊर्फ फत्तहेबाद है गांव व रेलवे स्टेशन, राजपुताना माळवा रेलवेची सांडवा ते अजमीरपर्यंत जी लाईन गेली आहे, निजवर इंदूर पलीकडे असून तें हलीं शियांच्या राज्यांत आहे, व येथून उज्जयनीय बौदा मैलांचा एक रेलवेचा फांटा नेलेला आहे. अजमीर रस्त्यावर फस्याबाद पलीकडे जवळच चंबळा नदी. असून तिजवर रेलवेचा पूल आहे व त्यावरून निमच, चितोडगडवरून अजमीरपर्यंत गाडो गेलेली आहे.