Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११ )

जाकून टाकीत. प्रत्यक्ष लूथर ( सन १५३०) ह्यास भूतांबरोबर झगडे करावे लागले; ह्मणजे लूपरसारख्या माणसाचा त्यावेळीं भूतावर विश्वास होता. स्याकाळच्या लोकांत चेटकाविषयीं अता समज होता की, चेटक करणारणीच्या घरचें मांजर घेऊन त्याचें रक्त काढावें, सात वर्षांच्या कुमारिने सूर्योदयापूर्वी उठून कांहीं वनस्पतींचा पाला गोळा करावा, आणि तो त्या रक्तांत यांहून त्याचा लेप लावावा, झणजे चेटक उतरते, असा युरोपांत समज होता. बटेझपस्कल एक वर्षांचा असतांनाच त्याचें चेटक वरील उपचाराने उतरले. विद्वान् शास्त्रवेत्ता केप्लर याच्या मावशति चेटक करण्याबद्दल फाशीची शिक्षा झाली; त्याची आई मोठ्या मिनत- वारीने ह्या संकटांतून सुटली. स्वतः केप्लर सर्व युरोपति त्यावेळेस शास्त्रीय विषयांत इतका विद्वान असतां, " चेटकें सत्य आहेत; ती मिथ्या असें कोणास यां यावयाचें नाहीं; " असा त्याचा स्वतःचा ग्रह होता. केप्लर सन १६३० त मरण पावला. सारांश अकचराच्या वेळचें हिंदुस्थान व युरोप ह्यांची तुलना केली असता, हिंदुस्थानचाच योग्यता अधीक ठरते. युरोपातील बहुधा कोणत्याही देशाची राज्य- व्यवस्था हिंदुस्थानपेक्षा चांगली नव्हती. अकबराच्या ताब्यांतील मध्य हिंदुस्थानच्या सामान्य लोकांपेक्षा इंग्लंडांतील सामान्य जनसमूहाची स्थिती जास्त सुखकर नहती. सतराज्या शतकाच्या आरंभी युरोपच्या शेतकरी वर्गाची स्थिती वास्तवीक कशी होती हैं। समजण्यास फारसा मार्ग नाहीं; तरी " सायमन साधुर्वे चरित्र" ह्मणून फ्रेंच भाषेत एक पुस्तक आहे, त्यांत सन १७०९ च्या सुमारास ह्मणजे अकबरानंतर शंभर वर्षांनी फ्रान्सच्या शेतकन्यांची स्थिती कशी होती, ह्याचे फार मनोरम वर्णन दिलें आहे, तें वाचलें असतां हिंदुस्थानचें मार्गे दिलेलें वर्णन मिथ्या अगर अतिशयोक्तीचें असें कोणास - ही वाटणार नाहीं. फ्रान्सच्या शेतकन्यांची स्थिती विशेष निकृष्ट होती, ही गोष्ट खरी, पण अकबराने दुःसह कर बंद करून, लोकांस तगाईच्या रकमा देऊन आणि आणीबाणीच्या प्रसंगी त्यांस धान्य वाटण्याची तजवीज अमलांत आणून आपत्काळी, लोकांचें रक्षण करण्याची उत्कृष्ट योजना करून ठेविली होती. इंग्लंडच्या लोकांच्या स्थितीबद्दलही अनेक पुस्तकांतून माहिती मिळते; पण अकबराच्या रयतेपेक्षां ते लोक सुखी होते, असें मानण्यास कोठेंच आधार नाहीं. लणजे, त्या काळांत धार्मिक व राजकीय बाबतीत युरोप खंडाच्या मानानें हिंदुस्थान देश अधीक पुढे होता, आणि युरोपातील बहुधा कोणत्याही देशाच्या राज्यभ्यवस्थेपेक्षा हिंदुस्थानची राज्यग्यवस्था अधीक चांगली होती, असें हाणण्यास काहींच प्रत्यवाय रहात नाहीं.

 अकबर बादशहा हा स्वतः सुनी पंथाचा होता; तरी मुसलमानी धर्मातील इतर पंथ, व म्या पंथाचे लोक आणि इतर निरनिराळे धर्म व त्या धर्मातील लोक,