Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यांना तो समान दृष्टीने पहात होता; तथापि दुसन्याच्या समाधानाकरिता व दुसन्यास संतुष्ट ठेवण्याकरितां त्याला "शियापंथ मला पसंत नाहीं " असें ह्मणून तात्पुरती सुनी धर्माची महती कबूल करावी लागली. अकबराच्या धर्मस्वातंत्र्याच्या नवीन कल्पनांनी चंगालप्रतिति बंड झाल्यानंतर अकचरानें आपले धोरण बदललें, इतक्यांतच तुराणचा सुनीपंथी राज्य कर्ता अबदुल्लालान युझचेग याच्याकडून एक वकील अकचराकडे पत्र घेऊन आला; या पत्रांत अकबराच्या नवीन धर्माबद्दल त्याचा उपहास केला होता; मुसलमानी धर्माचो अवज्ञा करीत असल्याबद्दल त्यास दोष दिला होता; आणि ब्राह्मण वगैरे पंडितांना तो आदराने वागवीत असल्याबद्दल त्याची पुष्कळच कानउघाडणी केली होती. त्यावर अकबरानें अबदुल्लाखान यास में उत्तर पाठविलें, त्यांन तो झगतो:- माझा धर्म कुराणास अनुसरून आहे आणि त्यामुळेच माझ्या राज्याची अशी सारखी भरभराट होत आहे. धर्म आणि भाग्य कर्म आणि किसमत-हीं दोन्हीं जुळों भावंडे आहेत; व सर्व धर्माचे लोक माझ्या भजनों आहेत. अशा रीतीने हिंदू व किस्सी, या उमयताचाही मी पाडाव केला आहे, त्यामुळे मुसलमानी धर्माला मी स्वरूप दिले आहे, तेच निःसंशय योग्य आहे. आतां माझी एवढीच इच्छा आहे कीं, हिंदूक पूर्णपणे ताब्यांत आल्यावर मग फिरंग्यांचा-पोर्तुगीन लोकांचा- समाचार घ्यावा, कारण त्यांनीं पश्चिम किना-यावर बराच प्रदेश काबीज केला असून, शिवाय ते आमच्या मक्केत जाणा-या येणा-या यात्रेकरूंनाही मुद्दाम विनाकारण त्रास देत असतात, - -ब आहेत. आणि मी तुमच्याच सुनी पंथाचा असून शिया पंथ मला पसंत नाहीं." लणजे अबदुलाखान यास खुप करण्याकरितांच त्याने शियापंथाबद्दल नापसंती दाखवून, सुनी पंथाची महती मान्य केली होती, हे उघड आहे.

 बादशहा जहाँगीर याला स्वत:लाच मुळीं आपल्या धर्माची फारशी परवा नव्हती, तेव्हां त्याच्या कारकीर्दीत धार्मिक भानगडी होण्याचें मुळकों कारणच नव्हते. तथापि त्याच्या कारकीर्दीत अकचराच्या वेळचें हिंदी वळण कमी होऊन इराणी वळण अतीशय वाढलें; आणि नूरजहान हीच सर्व राज्याची सूत्रचालक चनल्यामुळे तिचें सर्व कुटुंब वैभवसंपन्न झालें. नूरजहानचा आजा ख्वाजामहंमद शरीफ हा खुरासानच्या सुलतानाचा वजीर असून तो मोठा विद्वान् व कवी होता; व त्याचा मुलगा-नूरजहानचा बाप-ध्यासवेग हा इराजांतून आपला जीव जगविण्याकरितां पळून हिंदुस्थानात आलेला होता है घराणे शिवाधर्मी होते, आणि नूरजहानमुळे या काळात अनेक शियाधमीची टुंचे इराणांतून हिंदुस्थानात येऊन, त्यांचेही दरबारांत व राज्यकारभारति महत्व वाढलें होतें. तथापि जहांगीर, नूरजहान, घ्यासचेग अथवा इतर कोणीही धार्मिक बाबतींन न पडल्यानें, कोणतीच मानपत्र उपस्थित झाली नाहीं.