Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०)

सह्या केल्या. (इ. सन १५७९ ) नंतर या करारनाम्याची चोहोकडे प्रसिद्धी करण्यात आली, त्यामुळे उलमांचे महत्व नष्ट झाले; अधिकार नाहीसा झाला; उलमांचा अध्यक्ष व सरन्याधीश या उभयतांनाही अकबरानें नौकरीतून काढून टाकिलें; आणि उलमांचा पाडाव झाल्यामुळे एक दडपण नाहींसें होऊन बादशहाचा धार्मिक अधिकार, राजकीय अधिकाराप्रमाणेंच स्वतंत्र झाला; व त्यामुळे ही आपसांतील चुरशीची धार्मिक स्पर्धा थंड झाली.

 या काळात अशाच प्रकारचे स्मरणीय धर्मकलह क्रिस्तीधर्मातही माजले होते, आणि नवीन मतांची सुधारक मंडळी थोतांडी व दांभिक उपाध्यायाशी भांडून धर्मगुरूंचे स्तोमं व महत्व नाहींसें करण्याचा प्रयत्न करीत होती; इंग्लंडच्या आठव्या हेनरीने पोपचा संबंध तोडून टाकून ज्याप्रमाणे आपण स्वतःच धर्मगुरू हणून जाहीर केलें, तसाच प्रकार हिंदुस्थानांत अकबरानें केला होता; आणि युरोपांतील लूथर, विक्लिफ वगैरे स्वतंत्र विचाराच्या विद्वान् लोकांप्रमाणेच शेख मुबारिक हा हिंदुस्थानति उत्पन्न झाला होता, थोडक्यांत ह्मणजे, युरोप व हिंदुस्थान या देशा- तील राजकीय व धार्मिक परिस्थिती तुलनात्मकदृष्टया पाहतां मुसलमानी रियासतीत लटल्याप्रमाणें, एकंदरीत अकबर बादशहाची गणना पृथ्वीवरील थोर राजकर्त्यांमध्यें झाली पाहिजे. हिंदू मुसलमान यांच्यासंबंधानें त्यानें जातिभेद किंवा धर्मभेद दाखविला नाही. इतका निःपक्षपात हिंदुस्थानांत कधीं कोणी दाखविल्याचें उदाहरण आढळत नाहीं. स्वजातियांच्या हेकेखोरपणाबद्दल त्यानें शब्दाने व कुनीनें तिरस्कार व्यक्त केला आहे. दोनहिं धर्मातील आढळून आलेली व्यंगे काढून टाकण्याचा त्याने प्रयत्न केला, हे विलक्षण होय. शौर्यामध्ये त्याची बरोबरी करूं शकणारे असे थोडेच पुरुष सांपडतील. त्याची बुद्धी अचाट होती. इंग्लंडांत न्याच्या वेळेस इलिसांचे राणी राज्य करीत होती. अकबर गादीवर येण्याचे अगोदर युरोपांत सीवर बॉर्जिया नुकताच मरण पावला होता. सन १५२७ त रोम शहराची सात महिनेपर्यंत भयंकर लुटालूट चालली होती. इंग्लंडांत गणितशास्त्रावर पहिलें पुस्तक सन १५४० त छापलें गेलें; सेंट बार्थोलोमोची कत्तल सन १५७२ त झाली. स्पेन देशाहून इंग्लंड देश जिंकण्याकरितां आलेल्या मोठ्या आरमाराचा सन १५८८ त नाश झाला. शेक्सपीयर कवीचें पहिले काव्य सन १५९३ त छापलें गेलें, सन १६०० मध्ये रोम शहरांत ब्रूनोला जिवंत जाळले. युरोपातील भिन्न भिन्न राष्ट्रांमधील व्यवहारांचे नियमन करणारा कायदा तयार होण्यास आणखी शंभर वर्षाचा काल लागला. चेटके करणारांस इंग्लंडात सन १७१२ पर्यंत फाशीची शिक्षा होत असे. सन १७१८ पर्यंत फ्रान्सांत व सन १७८० पर्यंत स्पेन देशांत बेटकी लोकांस