Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९)

पंथाच्या सरन्यायाधीशानें, पुष्कळ लोकांस त्यांनी शिया पंथाचा स्वीकार केल्याबद्दल देहांतशिला सांगितल्या आणि त्या अमलांत आणण्याबद्दल उलमा मंडळींनी अकबरास अतिशय आग्रह केला; परंतु अशा घोर शिक्षा अमलांत आणण्यास अकबराचें मन कचरूं लागलें, अबुलफज्लू हा हे सर्व उघडचा डोच्यांनी व बंद तोंडानें स्वस्थ पहात बसला होता; अकबराच्या मनांतील हेतू त्याने ताडिला होता; आपल्या बापास त्रास देणारे हेच उलमा आहेत, है तो विसरला नव्हता, त्यांच्या तुटपुंज्या ज्ञानाची त्याला पूर्ण माहिती होती, त्यांची आपसांतील फूट तो जाणून होता; आणि आपल्या बापाच्या त्यांनी केलेल्या छळणुकीचा सूड सध्याज उगवून घेण्याला माता सोन्यासारखी संधी अनायासेंच प्राप्त झाली आहे, अशी त्याची खात्री होती; तथापि तो दरबारी व्यवहार- वागणुकींत पूर्ण वाकचगार, महा दूरदर्शी व निग्रही असल्याने वरकरणी " आपण तर कशांतच नाहीं, " असा मोठा साळसूदपणाचा त्यानें आव भगिला; आणि आंतून मात्र आगीत तेल ओतण्यांत तो मोठ्या उत्सुकतेनें व उल्हासानें तत्पर राहिला.

 त्यानंतर अकचराने सर्व उलमांना एकत्र बोलावून आपणांसमक्ष सर्व प्रश्नांचा त्यांनी ऊहापोह करावा, असे ठरविरें, फत्तेपूरशिको येथें आपल्या खासबागेत " इबादत- खाना या नांवाचें एक भव्य मंदिर उमारिलें; आणि त्याला चार मोठाली दालनें ठेवून त्यांत सर्व जातींच्या व धर्माच्या लोकांस बसण्याची व्यवस्था केली; अबुलफल ह्मणतो कीं, शिया, सुनी, सुफी, पंडित, धर्मोपदेशक, वकील, ब्राह्मण, बौद्ध, किस्ती, यहुदी, फारशी व इतर पंथाचे विद्वान् लोक या समेत वादविवाद करण्यासाठी आणिले होते; व प्रत्येकजण आपआपलें लगणे निर्भयपणे सांगत होता. अबुलूफज्लू हा अकबरच्या आज्ञेनें, प्रश्न काढून वादविवादास सुरवात करीत असे; आणि पाहिजे ते वांकडे तिकडे प्रश्न पुढे आणून उलमा मंडळींना चिडवीत असे; त्यामुळे एक दिवस वादविवादांत मोठी आरडाओरड झाली व अखेरीस एकमेकांची उणीं काढून परस्परांस शिव्या देण्यापर्यंत मजल आली; शेवटीं उलमा मंडळींतच फार मतभेद असल्याचें दृष्टोत्पत्तीस आले; आणि फज्लू याच्या अडवणुकीच्या मार्गामुळे आणि त्यांच्यात आपसांतच एकोपा नसल्यामुळे हा मतभेद अधीक स्पष्टपणें निदर्शनास आला. तेव्हा ज्या ठिकार्थी उलमांचा मतभेद होईल, त्याठिकाणी बादशहाने अखेरचा निकाल करावा, असें अकचराने सुचविलें; व त्यानंतर उलमांच्या नावाने एक करारनामा करण्यांत आला त्यति, "ज्या ज्या वेळीं उलमामंडळीमध्ये मतभेद होईल, त्या त्या वेळीं, त्या या प्रश्नाचा अखेरचा निकाल करण्याचा व कुराणांतील वचनास अनुसरून धर्मोत नवीन फेरफार करण्याचा अधिकार बादशहास आहे. " असा मजकूर असून तो अबुलू- फलचा बाप शेख मुबारिक याने लिहून काढिला आणि त्यावर सर्व उलमांनी नाइलाजानें