Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८ )

पाठविला. आग्रा येथील उलमा मंडळीस है कांहींच माहीत नसल्यामुळे, फैजी यास शिक्षा करण्याकरितांच बादशहानें चितोड येथें बोलाविलें आहे, अशी त्यांची समजूत होऊन त्यांना फार आनंद झाला आणि तेथील फौजेच्या अधिकान्यानें फैजीच्या घरी जाऊन व त्यास पुष्कळ त्रास देऊन, त्यास पकडून बादशहापुढे हजर केलें; फेजीही घाबरलेला होताच; पण बादशहाने त्याचा योग्य सत्कार केला, तेव्हां त्याच्या जिवात जीव आला; या वेळे - पासून अकबराने त्यास आपणाजवळ ठेविलें; * व त्याच्याच शिफारसीनें पुढे त्याचा भाऊ अबुलकल याची व अकबराची ओळख झाली; मुबारिक आमा येथून पळून गेला, तरी त्याच्या या उभयतां मुलांनीं आपला विद्यार्जनक्रम सतत चालू ठेवून ते दोघेही मोठे विद्वान् निपजले; तथापि या उभयतांमध्यें अबुल्फज्ल हा अलौकिक बुद्धीचा, अतीशय धोरणी व मधुरभाषी असल्यामुळे अकबरास खूप करून त्यानें लवकरच अकचरावर आपली पूर्ण छाप बसविली; पुढे पुढे तो अकबराचा विश्वासू मित्र व चतुर सल्लागार बनला; आणि शेवटीं तर तो अकबराचा इतका जीव की प्राण होता कीं, जहांगीरने अचुल्फज्ल यास ओच्छेकर राजा वीरसिंहदेव याच्या मार्फत ठार मारविल्यानंतर ( ता० १२ आगष्ट ६० सन १६०२ ) अकबर हा कबूतरें उडविण्याची मजा पहात बतला असतां फरीदबक्षी यानें येऊन अबुल्फज्ल याचा खून झाल्याची बातमी त्यास कळविली; त्याबरोबर अकबर एकदम मोठ्याने ओरडून बेशुद्ध पडला ! आणि पुढे कांहीं वेळाने शुद्धीवर आला, तरी न्याच्या डोळ्याचें पाणी कित्येक दिवस खळलें नाहीं. या दुःखाने या भयंकर वज्राघातामुळे, अकबर हा पुढे मरेपर्यंत नेहमीं अतीशय शोक करीत असे; अत्यंत विव्हळ होत असे; आणि " सलीम-भावी जहांगीर-यास राज्यच पाहिजे होते, तर त्यानें खुद्द मलाच ठार मारावयाचें होतें ! गरीब चिचान्या अवुल्फज्ल यास मारून न्याला काय मिळाले ? " असें तो नेहमीं कळवळून ह्मणत असे; असा हा अकबराचा कंठमणी असलेला अबुल्फज्ल हा अकबराच्या सन्निव असल्याने या धार्मिक भानगडीला चांगलाच रंग चढला. नवा आणि जुना हे दोन्हीही पक्ष एकेरीवर आले; प्रत्येक दुसन्याला नामशेष करण्याच्या अट्टाहास स पेटला मुबारिक यास कैद करण्याचा उलना मंडळींनी हुकूम मिळविल्यामुळे या विजयानें, आपल्या प्रतिस्पर्थ्यांचा बीमोड करण्याला त्यांना दुप्पट हुरूप आला; मुबारिक ची मह स्वाची शिकार हातची निसटल्यामुळे उलमा मंडळी अधीक चवताळली; आपा येथील सुनी


 * याच वेळेपासून मुबारिकचा वनवास संपून तो आग्रा येथें परत आला; उलमा मंडळीकडून त्याचा होणारा छळ बंद झाला व पूर्वीप्रमाणे अध्यापकाचें काम करून तो तेथे सुखानें कालक्रमणा करीत राहिला.