दिवस राहिला; उत्तर हिंदुस्थानांत पुष्कळ प्रवास करून व अनेक गुरुजनांजवळ विद्याध्ययन करून त्यानें अतीशय ज्ञान व विद्वत्ता संपादन केली; व नंतर तो आमा येथें आला; आणि अकबराने विद्वान् लोकांच्या उपजीवनाकरिता काहीं जमिनी तोडून दिल्या होत्या, त्यांतील नेमणुकीवर, यमुना नदीच्या काठीं एका साधूच्या जवळ राहून, अध्यापकाचें काम करूं लागला. तो जुन्या पुस्तकांवर विश्वास न ठेवितो स्वतंत्ररीतीनें साधकबाधक गोष्टींचा पूर्णपर्णे विचार करून खन्याखोट्याचा निर्णय करत असे; आणि प्रचलित पद्धतीहून अग- दींच निराळी, अशी त्याची शिक्षणपद्धति असे; त्यामुळे लोकरच त्याचा अतीशय लौकीक झाला; आणि प्रचलित धर्माच्या अत्यंत अभिमानी असलेल्या उलमा मंडळीविरुद्ध होणान्या खटपटीत तो प्रमुख असल्यामुळे ती मंडळी त्याला पूर्ण पालथा घालण्याच्या प्रयत्नाला लागली. त्यामुळे त्यांनी "शेख मुबारिक हा स्वत: पतित असून दुसन्यास अधोगतीस पोहोचवीत आहे, यासाठी त्यास एकदम देहांतप्रायश्चित्त यावे" असे सांगून शेख मुचारिक यात कैद करण्याचा अकबराकडून हुकूम मिळविला; परंतु मुचारिक यास ही बातमी अगाऊ लागल्याने, तो आपले दोन्ही मुलगे, ( अचुर फैजी, जन्म इ० सन १५४७ मृत्यु इ० सन १५९५ ता० ५ आक्टोबर आणि अबुलफज्ल जन्म इ० सन १५५१ मृत्यु इ० सन १६०२ ता० १२ आगष्ट ) आग्रा येथें टाकून, शिको येथील प्रसिद्ध साधु- पुरुष सेब सलीम चिस्ती-ज्या साधुपुरुषाच्या कृपेनें आपणास हा पुत्र झाला असें समजून अकचरानें त्याचें नांव सलीम असें ठेविलें होतें, तो साधुपुरुष शेख सलीम चिश्ती याच्या मदतीने गुजराथप्रतिांत आपला जीव घेऊन पळून गेला, आणि बादशहा अकबर याचा दूधभाऊ आणि त्या प्रांताचा सुभेदार अजीज को का याच्या आश्रयास राहिला; त्यानंतर अजीज यानें बादशहाकडे मुबारिकबद्दल रदबदली केली; इतक्यांतच योगायोगानें त्याचा वडील मुलगा फैजी याचाही अकबर बादशहाशी भेटीचा योग घडून आला व त्यामुळे या घराण्याचे महत्व वाढून राजकीय पटावरील महत्त्वाच्या मोहन्यांत ते प्रमुखत्वाने झळकण्यास प्रारंभ झाला.
अबुल फैजी हा यावेळी अगदी तरुग ह्मणजे २१ वर्षांचा होता; तो स्वतः साधुवृतीने राहणान्या सुफी पंथाचा असून नेहमीं निरनिराळ्या विचारांत व सुवासिक फुलें, सुगंधी द्रव तैलें व सुंदर मये यांतच नेहमीं गढलेला असे आणि तो उत्तम कवनें करीत असुन त्यांत निरनिराळ्या नव्या नव्या व चमत्कारिक कल्पना असत व तीं कवने ईशस्तुतीपर भक्तिरताने ओथंबलेली असत; यावेळी अकबराने चितोड येथें वेढा दिला होता व तेथें असतांनाच के नीची कीर्ति त्याच्या कानावर गेली व त्यानें फेजीस चितोड येथे आपल्या भेटीस बोलाविलें; व त्यास तिकडे पाठविण्याविषयीं आपा येथील स्थानिक अधिकान्यास हुकूम