Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फायदा झाला; ह्मणून या धार्मिक मतभेदासंबंधी थोडक्यांत याठिकाण हकीकत दिली असून त्यावरून तत्कालीन राजकीय परिस्थितीचें योग्य ज्ञान होईल, अशी आशा आहे.

 मुसलमान लोकांत शिया, सुनी, सुफी, वाहबी, शेख, सय्यद, अफगाण, तुर्क, युझवेग, इराणी, आश्च वगैरे अनेक भेदाचे व पंथाचे जातिविभाग आहेत. प्रारंभी सर्व मुसलमान लोक मोहरम महिन्याचा पहिला पंधवडा, " सणाचे दिवस " लणून पाळीत होते; परंतु पुढे त्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, अथवा तारखेस हुसेनचा खून झाल्यामुळे, हिंदू लोकांच्या मूर्तिपूजेच्या धर्तीवर शियापंथी मुसलमान साबुनौत हुसेनचें भजन करूं लागले. मोंगल बादशहा बाबर हा शियापंथी होता; तथापि प्रारंभी दक्षिणेत आलेले मुसलमान व त्यांचे वंशज बहुतेक सुनी पंथाचे होते, व या लोकांस " दक्षणी " असे नांव मिळाले होते. बादशहा बाबर याच्या काळापासून बादशाही फोजंत आणि विशेषतः वरिष्ट अधिकारांच्या जागांवर आपल्या धर्माच्या अथवा जातीच्याच लोकांना आपल्या जन्मभूम तून आणवून भरती करण्याचा प्रघात पडला होता. कारण मोगल बादशहा हे हिंदुस्थानांत परके असल्यामुळे, तद्वेशियांवर पूर्ण भरंवसा ठेवणें त्यांना धोक्याचे वाटत होतें; आणि भरंवशाचे खात्रीचे व आपल्या जिवास जीव देण्याइतक्या जिव्हाळ्याचे असे आपल्या भूमीतील लोक हिंदुस्थानांत आणण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती; व नेहमी ताज्या रक्ताचे लोक स्वभूनींतून आणवून व त्यांची सैन्यांत मरती करून, चादशाही सैन्याचें सामर्थ्य कायम ठेवण्यांत येत होते. मुसलमानांत शिया व सुनी, या दोन पंथांमध्यें जरी पुष्कळच विरोध आहे, तरी ज्याला त्याला आपआपल्या मर्जीप्रमाणे यापैकी कोणताही पंथ स्वीकारण्याची मुभा आहे, आणि बाप शियापंथी असून मुलगा सुनापंथी असल्याचेंहिं इतिहासांत दाखले आहेत. उदाहरणार्थ, दक्षिणेत बहामनी राज्याची स्थापना करणारा हसन गंगू हा शियापंथी असून त्याचा मुलगा महंमदशहा हा सुनीपंथाचा होता, ह्मणजे अशाप्रकारें जरी प्रत्येकाला आपल्या मर्जीना शिवा अथवा सुना पंथ स्वीकारण्याची पूर्ण मुभा आहे, तरी त्यामुळे परस्परांमधील विरोधाची तीव्रता कमी झालेली नाहीं; उलट त्यामुळेच पुष्कळ निरनिराळ्या राजकीय भानगडी उपस्थित झाल्या.

 युझचेग मोंगलांचा सरदार, आणि चंगीझखान याचा वंशज महंमद शयबानीखान यानें इ० सन १५०३ मध्ये अक्शी येथें बाबर याचा पूर्ण पराजय केला. तेव्हां तो काबूल येथे आला व तेथील राज्य त्याने आपल्या हस्तगत करून घेतलें. ( इ० सन १५०४) या काळापूर्वी समर्कद हे शहर बाबरच्या ताब्यात होते; परंतु त्याच्या शत्रूंनी ते हस्तगत करून घेऊन त्यास हाकलून लाविले; तेव्हा बाबर यानें इराणचा शियाधर्मी शहा इस्माईल सुफी याची मदत मिळवून समकेंद्र राज्य तिसन्यावेळी मिळविले, (३० सन १५११४)