अक्टोबर ) यावेळी इराणच्या शहास संतुष्ट करण्याकरिता बाचर यानें शियापंथाचा स्वीकार
केला, परंतु बाबर बरोबरील सुनी मंडळींना त्याबद्दल वाईट वाटून ते त्यास सोडून गेले;
आणि समर्कद येथील सुनी मुसलमानही बाचरवर नाराज होऊन, त्यांच्या मनांत त्याच्या-
विषयीं द्वेषभाव घाणला. त्यानंतरही समर्केद शहर बायरच्या हातून गेलें; तेव्हाही
पुम्हाँ इराणी लोकांची मदत मिळवून ते हस्तगत करावें, आणि आपल्या शत्रूंची सोड
मोडावी, अशी बाबर याची खटपट होती; परंतु इराणी लोकांनी समर्कंद परत मिळवि
ण्याच्या काम त्यास मदत केली नाहीं; तथापि त्यांनी बाघरचा कट्टा शत्रु जो शयचानासान
याच्या विरुद्ध त्यास मदत केली, त्यामुळे खानाचा वध होऊन बायरचा एक बलाढ्य व
भीतिमद शत्रू नष्ट झाला. या खानाचा वध केल्यानंतर त्याच्या शरिराचे तुकडे आस-
पासच्या राज्यकर्त्यांकडे " नजराणा " ह्मणून पाठविण्यांत आले; त्याच्या डोक्यांत पेंढा
भरून ते कान्स्टॉटिनोपल येथील बादशहाकडे नजर ह्मणून रवाना करण्यांत आले; आणि
त्याच्या कपाळाची कवची सोन्याने मढवून ती इराणच्या शहानें स्वतः आपल्या मद्य प्रारा
माच्या उपयोगात आणिली।— थोडक्यांत ह्मणजे बाबर याला स्वतःलाच शिया व सुनी
यांच्यामधील तीव्र धार्मिक मतभेदाचा अनुभव आला होता, त्यामुळेच त्याने आपला प्रिय
मुलगा हुमायून यास केलेल्या कल्याणप्रद व अमोल्य उपदेशांत, शिया व सुनी यांतील
मेदाकडे कानाडोळा करून वागत जा, धार्मिक मतमतांतरांना राजकीयदृष्ट्या बिलकूल
महत्व देऊं नकोस - असे मुद्दाम बजाविलें होतें हैं उघड आहे.
बादशहा चाचर याच्या नमागेच बादशहा हुमायून हा हिंदुस्थानात पदभ्रष्ट होऊन
समर्केदकडे गेल्यानंतर, मिस अस्करीपासून आपल्या दगाबाज भावापासून आपला जीव
बचावण्याकरितां, तो आपला प्रीय मुलगा अकबर यास मार्गे टाकून, आपली बायको व
त्याची आई हमीदाचानू हिला आणि आपला विश्वास, एकनिष्ठ, हुषार व साह्यकारी सरदार
बहरामखान यास बरोबर घेऊन तसाच इराणांत पळाला. त्यावेळी इराणांत शियापंथाची
स्थापना करणारा व त्या पंथाचा कट्टा अभिमानी असलेला प्रसिद्ध शहा इस्मईल सुफी-
यासच संतुष्ट करून आपल्या पक्षास मिळवून घेण्याकरितां बाबर यानें शियापंथाचा स्वीकार
केला होता-याचा मुलगा तह्मास्प हा गादीवर होता. या शहाची मदत मिळवून,
'आपण आपले हिंदुस्थानांतील गमाविलेले राज्य पुन्हा परत मिळवावें; " अशी हुमायून
याची इच्छा होती; ह्मणून त्यानें बहरामखानामार्फत त्याच्याशी बोलणें सुरूं केलें. त्यावेळी
"हिंदुस्थानांत शियापंथ सुरू कराल, तरच तुझांस मी मदत देनों," असे शहानें हुमायून
यास स्पष्ट कळावेलें; परंतु हुमायून यास शहाचं है लगणे मान्य करवेना, तेव्हा आपलें
झगणें हुमायून यास मान्य झाले नाही, असे पाहून तहमास्व याने रागानें हुमायूनकडे एक