Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा.

0:

प्रास्ताविक माहिती. ( मागील भागावरून पुढे चालू. ) परिच्छेद पहिला. मुसलमानांतील धार्मिक मतभेद आणि त्याचे राजकीय परिणाम. शिया मागील पडल्याचें -- गोल भागांत, बादशहा बाबर यानें हुमायून यास केलेल्या उपदेशांत व सुनी यांतील भेदाकडे कानाडोळा कर, नाहीं तर मुसलमानी धर्मात फूट शत्रूच्या नजरेस येईल " असे बजाविलें; त्यासंबंधीं- प्रफगाण व मोंगल यांच्या- मधील वैरभावासंबंधी, आणि " ज्यांच्या पराक्रमावर सगळ्या लष्कराची भिस्त, अशा शियापंथी प्रचळ सरदारांचा " औरंगझेबानें छळ केला, त्यासंबंधी उल्लेख करण्यात आलेला आहे; परंतु ह्या धार्मिक मतभेदामुळे, मांगली साम्राज्यांत व विशेषतः दक्षिणेतील मुसल मानी राज्यांत पुढे अतिशय घोटाळे व भानगडी उत्पन्न झाल्या; राजकीय परिस्थिति अत्यंत धोक्याची झाली, आणि दक्षिणेत मराठ्यांचे महत्व स्थापन होण्याला इतर अनेक गोष्टीं- बरोबर हीहि गोष्ट प्रमुखत्त्वानें कारणीभूत झाली. त्याप्रमाणेच मराठ्यांसंबंधींचा अवरंग- शेवाच्या हाडींमासी खिळलेला द्वेष, जसा त्यांच्या उत्कर्षास उत्तेजक झाला, तसाच शिया- पंथाविषयीं त्याच्या ठिकाणी बाणलेला द्वेषही मराठ्यांच्या उत्कर्षास पोषक झाला. कारण या धार्मिक मतभेदाच्या द्वेषामुळे त्यानें दक्षिगेंतील विजापूर व गोवळकोंडे येथील शियापंथी मुसलमानी राज्ये बुडविली, त्यामुळे त्या राज्यांतील मोठमोठे बलाढ्य मराठे सरदार मरा- ठ्यांना येऊन मिळाले, आणि तेच अवरंगझेबाचा नाश करण्यास उयुक्त झाले. शिवाय अवरंगतेचाच्या ह्या विध्वंसक व कुटिल राजनीतीचा मराठ्यांना आणखी दुसरा असा मह खाचा फायदा मिळाला कीं, दक्षिणेत मराठ्यांना मोकळे मैदान सांपडल्यासारखें झालें; आणि प्रसंगी मराठ्यांविरुद्ध त्यांची औरंगझेबास जी मदत मिळाली असती, तीही नष्ट होऊन गेली, अशा रीतीनें अवरंगचाच्या मराठ्यांवरील विरोधी भक्तीमुळे त्यांचा दुहेरी et