गार्शिया डसा वगैरेची हकीकत, पोर्तुगीज लोकांच्या ताब्यांतील प्रदेशाचें विवेचन, पान
२४३ - २४८, इंग्रज व इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीची पूर्व हकीकत, पान २४९-२५६,
इलिसापेथ राणीच्या काळांत, ब्रिटिशराष्ट्रीय व्यापार, आरमार व वांग्मय यांची झालेली
वृद्धी; पान २४९-२५२, इलिझाबेथ राणीनें हिंदुस्थानांतील राज्यकर्त्यांना देण्यासाठी
पहिल्या सफरीच्या मुख्यापाशीं दिलेले पत्र, पान २५३-२५४, इलिझाबेथ राणीनें
इंग्रज कंपनीस काही विशिष्ट हक्क व अधिकार दिले त्याचे विवेचन, पान २५४-२५५;
डच लोक इंग्रज लोकांची मोल्यूकस मधील अंचोयना बेटांत कत्तल करितात, इंग्रज लोक
व्यापाराकरितां हिंदुस्थानाकडे वळतात, व या देशांत व्यापारी व नंतर राजकीय श्रेष्ठत्व
मिळवितात, पान २५५-२५६, इंग्रज लोक मोगल बादशहाच्या फरमानाअन्वयें इ. सन
१६१२ मध्ये सुरत येथें आपली पहिली वखार स्थापन करतात, पान २५६, इंग्लंडचा
राजा जेम्म याजकडून सर टामस रो या नांवाचा एक वकील जहांगीर बादशहाच्या
दरबारी येतो, व व्यापारविषयक विशिष्ठ सवलती व हक मिळावतो, पान २५६-
२५७, हिंदुस्थानात इंग्रज, पोर्तुगीज व डच यांच्यामध्ये चालू असलेली व्यापारी
स्पर्धा,पान २५७-२५८, इ. सन १६०१ ते इ. सन १६२१ या
दरम्यान इंग्रज कंपनीला व्यागत अतीशय भरभराट होते, व त्यांच्या व्यापाराचा उत्तम
जम बसत जातो, पान १५८- २६०, इंग्रज मद्रास येथें वखार व किल्ला बांधतात,
पान २५९-२६०, बंगालमध्ये हुगळी नदीच्या वरील भागावर इंग्रज लोक आपली एक
चखार स्थापन करतात, पान २६०, मुंबईबेट इंग्रजांच्या ताब्यांत जातें, मुंबई
बेटाची हकीकत, २६०-२६३, हिंदुस्थानांत व्यापार करण्याला मोंगल बादशाहाची
परवानगी मिळविण्याकरितां, इंग्रज कंपनी स्थापन होण्यापूर्वी मिल्डन हाल कॅप्टन हॉकिन्स
बगैरे इंग्रज लोकांनी केलेल्या प्रयत्नाची हकीकत, पान २६३-२६४, मुंबई, कलकत्ता,
व मद्रास ही शहरें इंग्रज कंपनीची मुख्य ठाणी बनतात, इंग्रज व मोंगल
यांच्या नाण्याचा इतिहास, पान २६४-२६५, हिंदुस्थानांत इंग्रज व्यापारी ईस्ट इंडिया
कंपनी स्थापन झाल्यापासून शंभर वर्षांच्या आंतच हिंदुस्थानांत आपले राष्ट्र स्थापन कर-
ण्याच्या अनुरोधाने कसे प्रयत्न करीत होती, त्यासंबंधी विवेचन, पान २६५- २६८,
मराठ्यांना भूगोलविषयक माहिती होती यांचे द्योतक असगारे एक गुंडाळे नाना फडणीसाच्या दफ्तरात सांपडले, त्यांतील मजकूर, पान २६८- २७३, मराठ्यांच्या राज्याच्या उत्कपांच्या इतिहासाप्रमाणेच त्या राज्याच्या उच्छेदाचा दुःखपर्यवसायी इतिहासही महत्वाचा व वर्णनीय असल्याबद्दल विवेचन, पान २७४,
पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२ )