Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५० )

पर्यंत एकाच देशाला चिकटून बसलेले आढळत नाहींत. मानववंशाचे उगम शोधण्याची दिव्यदृष्टि लाभल्यास मनुष्याचा स्थानिक देशाभिमान कदाचित् सर्वच नष्ट होऊन त्याची विश्वबंधुत्वाची दृष्टि प्रभावी होईल. लो. टिळकांच्या उपपत्तीप्रमाणे आर्यन् लोक उत्तरधुवापासून निघून हळू हळू खालीं येत येत भूमध्य रेषेपर्यंत आले अ मानिलें तरी, खुद हिंदुस्थानांतच त्यांची वस्ती इतक्या दीर्घकाळपर्यंत झालेली आहे कीं, त्यांना आपण परक्या देशांत आहे, असे वाटणें शक्य नाही. इंग्रजांचे आद्यपूर्वज व आमचे आयपूर्वज हे कदाचित् उत्तरघुराजवळ कधीकाळीं एकत्र नांदत असतीलही; पण मनुष्याच्या आठवणीपलीकडच्या व वाङ्मयाच्या उगमापूर्वीच्या गोष्टी जमेस धरितां येत नाहीत; या दृष्टीने आह्मी हिंदू आर्य अनादिकालापासून हिंदुस्थानचे रहिवासी, आणि इंपज लोक अनादिकालापासून युरोपचे रहिवासी असेंच मानिलें पाहिजे. इंग्रज व मराठे मूळचे भाऊबंद माना किंवा सर्वस्वी परके माना; त्यांचा असा निकट संबंध येणे, हे आश्चर्यातील आश्चर्य होय."

......."हिंदुस्थानामध्ये प्रथम इंग्रज लोक केव्हा आले, हे पाहू जातो असें दिसतें की, नवव्या शतकात आलफेड राजानें पाठविलेले प्रतिनिधी हे प्रथम येथे आले. त्यानंतर चारांचरों वर्षानी ह्मणजे चवदाव्या शतकांत सर जॉर्ज मंडेव्हिल हा इंग्रज हिंदुस्थानांत आला. ऐतिहासिकदृष्ट्या या दोघां इंग्रजांचें आगमन वादग्रस्त आहे. मात्र इतके सरें कीं, मंडेव्हिल यानें हिंदुस्थानच्या प्रवासाविषय लिहिलेले पुस्तक ६० सन १४९९ साली लंडन येथें छापलें गेलें व इंग्लंडच्या छापखान्यांत छापलेलें असें हेंव पहिलें पुस्तक असलेलें सांगतात, है जर खरे असेल तर इंग्रजांनी छापलेले सर्वात पहिले पुस्तक हिंदुस्थानासंबंध असावे, हा योगायोग विलक्षण खरा. वरील दोघां इंग्रजांचे आगमन खरे मानले तरी ते हिंदुस्थानांत उपरी होते, ते येऊन फार तर नुसता देश पाहून गेले असतील, पण आधुनिक काळांत हिंदुस्थाननि खरोखर आला व इकडे वस्ती करून राहिला असा पहिला इंज टला झणजे फादर टॉमस स्टीफन हा होय. इ० सन १५७९ च्या आक्टोबरमध्यें स्टीफन हा ख्रिस्तीधर्माचा प्रसार करूने जमल्यास व्यापारही करावा, अशा हेतूनें गोव्यास आला व त्यापुढचें त्याचें सर्व आयुष्य हिंदुस्थानांतच गेलें, त्यानें विलायतेस हिंदुस्थानच्या लोक- स्थितीची व व्यापाराची मनोरंजक हकीकत लिहून पाठविली. साष्टी ह्मणजे ठाणें या- ठिकाणी राहून हिंदूलोकांस उपदेश करून बाटवून ख्रिस्तीधर्माचा प्रसार करण्याच्या खटपटीत त्याचीं पुष्कळ वर्षे गेलीं. याच स्टीफन साहेचानें " ख्रिस्तपुराण " नामक कोकणी मराठी मार्थेन पण रोमनलिपोर्ने एक ख्रिस्त वर्णनपर उत्कृष्ट ग्रंथ लिहिला. मराठी- कोंकणी भाषांचे व्याकरणही पोर्तुगीज भाषेत त्यानें लिहिलें. इ० सन १५८० साली