Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५१ )

राल्फफिच इंग्रज गृहस्थ सुष्कीच्या वाटेनें इराणच्या आखातापर्यंत आल्यावर पोर्तुगीज लोकांनी त्यास कैद करून गोव्यास पाठविलें. हिंदुस्थानांतून विलायतेत परत गेल्यावर त्याने इकडच्या लोकांविषयीं व संपत्तिषयीं ज्या चित्तवेधक हकीकती इंग्रज- लोकांस सांगितल्या त्यामुळे हिंदुस्थानासंबंधानें निकडील लोकांच्या मनांत औत्सुक्यकारक कल्पना उत्पन्न झाल्या. पुढे तीन वर्षांनी इ० सन १५८६ मध्ये टॉमस कॅव्हेंडिश नांवाचा इंमज पृथ्वीपर्यटण करीत करीत हिंदुस्थानांत आला होता. तो विलायतेस परत गेल्यावर त्याच्या मदतीने लंडनच्या प्रमुख व्यापा-यांनी अर्ज लिहून त्यावेळची इंग्रजी राणी इलिझाबेथ दजकडे सादर केला व त्यामुळे पूर्वेकडील देशांत व्यापारासाठी सफर करण्याची आपल्या प्रजाजनांस राणीने परवानगी दिली. पुढे लवकरच हणजे इ० सन १६०० साली इंस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. यापूर्वी एक वर्ष लंडनच्या व्यापान्यांनीं मिलन हॉल नाकाच्या हुषार व साहसी इंपजास राणीच्या मार्फन अकबर बादशहाशी बोलणे करण्यास हिंदुस्थानांत पाठविलें होतें. तो ६० सन १६०२ साली विलायतेस परत गेला; तेव्हा त्याजकडून दिल्लीच्या बादशाहाचे वैभव आणि हिंदुस्थानांतील सुधारणा व संपत्ति यांची यरीच कल्पना इंग्रजांना आली. "

 ब्रिटिश राष्ट्राच्या इतिहासति इलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीचा काळ-कारकीर्द ३० सन १५५० ते ६० सन १६०३ - हा पुष्कळ दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून, त्या काळात ब्रिटिश राष्ट्रीय व्यापाराची, आरमाराची व वाङ्मयाची संस्मरणीय अशी वाढ झालेली आहे. व्यापार, वसाहती व प्रदेशगमन यासंबंधी धाडसी रुन्ये करण्याच्या इच्छेबरोबरच, कष्टमय जलपर्यटणे करून, लांबलांबच्या देशांत जाऊन आपलें नशीब काढण्याच्या प्रयत्नांनाही याचवेळी जोराची चेतना मिळालेली आहे. याच राणीच्या कारकीर्दीत एका इंग्रज मनुष्याने ह्मणजे सर फ्रान्सिस ड्रेक यानें- अगर्दी पहिल्याने सर्व जगासमोंवत जलपर्यटण केले आहे, आणि हिंदुस्थान देशाकडे जाण्याच्या जवळच्या मार्गाचा शोध लावण्याकरितां इंग्लिश लोकानींही पोर्तुगीज लोकांप्रमाणेच प्रयत्न केला आहे व राल्फफिच्छ हा हिंदुस्थानांतून परत गेल्यावर लंडन येथील टर्की कंपनीमधील साहसी व्यापान्यांनी कॅप्टन रेमंड या नावाच्या एका मनुष्याच्या हाताखाली तीन गलबतें देऊन स्वास ता. १० एप्रील, इ० सन १५९१ रोजी लेमोथ येथून हिंदुस्थान देशाकडे रवाना केलेले आहे; शिवाय, इ० सन १४९६ मध्ये सातव्या हेनरीनें जॉन कॉर्बेट यास हिंदुस्थानाकडे जाण्याच्या मार्गाचा शोध लावण्याकरितां दोन जहाजांनिशीं जलपर्यटण करण्याचा राजकीय परवाना दिला होता व त्याप्रमाणें त्यानें जलपर्यटनही केलें होतें, परंतु, हिंदुस्थान देशाकडे जाण्याच्या नव्या मार्गांचा शोध