Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४९ )

त्याची सुरवात छत्रपति शिवाजीमहाराजांच्या काळापासून झालेली आहे; अर्थात् पुढील माहिती त्या काळांत येणार असल्यानें ती याठिकाणीं ग्रथिक करण्याची आवश्यकता नाही.

 ३ इंग्रज:- " मराठे व इंग्रज यांची अगदी पहिली भेट कोठें, केव्हां झाली असेल याचा नक्की दाखला तर मिळणे शक्य नाहींच ( मराठे व इंमज; हे पुस्तक पहा ) पण काळू बारीक डोळ्याच्या इतिहास संशोधकांसही या भेटीचा शोध लागणे कठीण; फार काय, उभयतांची गांठ प्रथम पडली असेल तेव्हां मराठ्याला हा इंग्रज किंवा इंमजाला हा मराठा असे ओळखतांही आलें नसेल. इंग्रज प्रथम हिंदुस्थानांत आले, तेव्हां मुसलमानांचे राज्य होते; अर्थात त्यावेळी इंग्रजांच्या डोळ्यांत मुसलमान तेवढा मरण्यासारखा होता; मराठ्यांकडे त्यांचे लक्ष कशाला जाईल ? सुरतेच्या किंवा दुसऱ्या एखाद्या कोंकणबंदराला लागलेले इंग्रज तडक दिल्लीकडची वाट घरीत उलटपक्षी मराठ्याने जेव्हां पहिला इंग्रज पाहिली असेल तेव्हां त्याला इंग्रजांचें नांवही ऐकून माहीत नसेल, त्यावेळी डच व पोर्तुगीज व्यापारीच इकडे हिंडत असत; त्यामुळे टोपीवाल्यांत टोपीवाला सहज मिसळला गेला असेल; मगठा पाहून इंपजाला वाटलें असेल की, "मांडचोळणा, पायघोळ आंगरखा व विचित्र पगडी घालणारा हा कोणी तरी अर्धवट रानटी मनुष्य असावा. उलट इंग्रजांची ती शिपतरी टोपी, तो अवाढव्य गळपट्टा व गोरा रंग पाहून मराठा मनांत झणाला असेल, " कोण विचित्र ध्यान हैं !” अद्यापि खेडेगांवांतून काबुली व्यापारी चाकू, काच्या विकावयाला गेला असता गांवचीं मुळे जशी त्याच्याभोंवतीं कौतुकाने गोळा होतात, तशींच पूर्वी इंग्रज व्यापारी पाहून गोळा होत असतील. पहिल्या पहिल्या इंग्रज प्रवाशांनीही हिंदी लोकांची वर्णने लिहून ठेविली आहेत, त्यांत खेडवळ मुलांची कुतूहलपूर्ण दृष्टीच दिसून येते. कोणाही दोघां विदेशी लोकांची प्रथम भेट अशीच आश्चर्यजनक असावयाची !

 या पहिल्या भेटीच्या वेळी इंग्रजाला आपण मराठ्यांचे राज्य जिंकून घेऊन त्यांचे धनी होऊं, " असें, किंवा मराठ्याला "आपणासमोर नमणारे, अदबीनें बोलणारे, गिन्हाइकांना खूष करू पाहणारे, हे सौदागर आपले राजे होतील असे कशानें मनांत येणार ? पण ईश्वराची लीला विचित्र आहे. तिच्यायोगानें अनेक चमत्कार या जगांत घडून येतान; आणि सहा हजार मैलांवरच्या इंग्रजांनी समुद्रमार्गानें हिंदुस्थानांत व्यापारी हणून यावे व अखेर येथील आधिराजे होऊन बसावं हा त्यातलाच एक चमत्कार होय. इतक्या दूरच्या लोकांचा इतका निकट संबंध आल्याचे जगाच्या इतिहासात है प्रायः पहिलेच उदाहरण असावें, आता जगात कोणतेही लोक अनंतकाळ-