Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४८ )

करून गोवें येथें पाठविण्यांत आलें. आर्मझ हैं बेट शहानें आपणा कडेसच ठेवून घेतलें; तथापि या उद्योगांत इंग्रजांचा पुष्कळच सांपत्तिक फायदा झाला, आणि गोंवरून येथें माल उतरण्याची परवानगी व जकातीची माफी मिळून शिवाय इराणांत पाहिजे तेथें रेशीम खरेदी करण्याचीही त्यांना परवानगी देण्यांत आली. ( इ० सन १६२२ ) तथापि या यादीत खुद्द लायल हाच " इंग्लिशांनी केलेल्या ह्या वरील कृत्यांबद्दल पोर्तुगीज लोकांनी जोराची तक्रार केल्याचे ऐकिवात नाहीं, तरी त्यामुळे हल्लींचे राजनीतिकुशल मंत्रिजनही खात्रीनें भयचकित होतील, अशा स्वरूपाचीं तीं कृत्ये होती. " असें ह्मणत असल्याने ( ब्रिटिश डोमीनियन इन इंडिया है पुस्तक पहा. ) त्यासंबंधी अधिक चर्चा करण्याचे कारणच रहात नाहीं. त्यानंतर इ० सन १६३० मध्ये सुरत बंदराजवळच इंग्रज व पोर्तुगीज यांच्यामध्ये एक जोराची आरमारी चकमक उडाली; त्यांत उभयतांची बरोबरी झाली तरी इंग्रजांचा वरचढपणा कायम राहून पोर्तुगीज लोकांना कमीपण्याच आला, याचवेळी डच लोक हेही हिंदुस्थान आणि सिलोन ह्यांमधील पोर्तुगीज लोकांच्या ताब्यातील दाप्रयांवर निकराचे एकसारखे हल्ले करीत असल्यामुळे त्यांच्या सत्तेचा सपा- क्याने न्हास होत चालला, आणि पुढे लवकरच ( इ० सन १६४० ) जरी पोर्तुगाल देश स्वतंत्र झाला, तरी इ० सन १६४८ मधील मन्स्टरच्या तहानें त्या देशाची हिंदुस्थानांतील ठाणी मर्यादित होऊन तें राष्ट्र कायमचे मार्गे पडलें.

 पोर्तुगीज लोकांच्या भरभराटीच्या काळात त्यांच्या ताब्यात खालील प्रदेश होता तो :- आफ्रिकेच्या किनान्यावर सोफला, मोचासा, मोझंथी क्यू हे किले आणि सोकोत्राची बेटें, अरेबियांत मस्कत, इराणांत ओर्मश, मकराणमध्यें ग्यूडेल येथें एक किल्ला अथवा यखार, हिंदुस्थानच्या पूर्वेकडील देशांत मलाका आणि म्याको हाँ दोन तटबंदीची शहरें, शिवाय तिडोर, अंघोषना, मनीला आणि पूर्वेकडील बेटांपैकी काहीं इतर ठाणी; शिवाय इतर ठिकाणी कांहीं वखारी; व हिंदुस्थानांत गाँवा आणि आसपासचा प्रदेश, वसई, मुंबई व दमण, गुजराथेत दीवचा मजबूत किल्ला व बेट, शिवाय डहाणू, सेंटजान्स, वसईचा प्रदेश व गोवा यांच्या दरम्यान चौल, गोव्याचे दक्षिणेस जोन्नार, बालोर, मंगलूर, कान्नोर, कोचीन व विलोन ( कोलम् ) येथील किल्ले; आणि कारो- aise किनान्यावर नागापट्टण, मेलियापुर (सेंटथाने ) आणि पुढे उत्तरेकडे मच्छलीपट्टण तथापि पोर्तुगीज सत्तेचा -हास होऊन आतां हिंदुस्थानांत फक्त दीव, दमण आणि गोवें, एवढीच काय ती फक्त तीन ठाणी त्यांच्या ताब्यांत राहिली आहेत.

 तथापि पोर्तुगीज लोकांचा धार्मिक छळ, क्रूर वागणूक आणि राजकीय ढवळाढवळ यामुळे पुढील काळांत मराठ्यांशी त्यांच्या चकमकी उडालेल्या आहेत; आणि