Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२४५)

विजयानगरचें राज्य नामशेष केले; परंतु मुसलमान राजेरजवाडे तिकडे गुंतले आहेत असें पाहून पोर्तुगीज लोकांनीं सिलोन येट काबीज करून त्याशिवायही आपला पुष्कळच फायदा करून घेतला. पुढे इ० सन १५६८ मध्ये लुई अथाएड ऊर्फ आड हा व्हाईसराय होऊन गोवें येथें आला. याच्या कारकीर्दीत मूर्तजा निजामशहा ( कारकीर्द इ० सन १५६५-१५८६) यानें पोर्तुगीज लोकांकडून रेवदंडा किल्ला हस्तगत करून घेण्यास तिकडे कूच करून त्यास मोठा कडेकोट वेढा दिला; परंतु पोर्तुगीज लोक समुद्रांतून धान्यसामुग्री आणूं लागले, आणि निजामशहाकडील सरदारांना दारूच्या बाटल्या नजर करून त्यांनी अंतस्थरत्या वंश करून घेतेले; त्यामुळे वेढ्याचे काम ढिले पडले


१ टीप:- मुसलमान लोकांनी रेवदंड्यास वेढा दिल्यावर पोर्तुगीज लोकांवरील या संकटाच्या प्रसंगी, जशा दारूच्या बाटल्या त्यांच्या मदतीस धावून आल्या व त्यांनी पोर्तुगीज लोकांना संकटमुक्त केलें, त्याप्रमाणेच मराठ्यांनीं कर्नाटक प्रांतावर इ. सन १७३९ मध्ये स्वारी केली तेव्हां अशाच दारूच्या बाटल्या फ्रेंचांच्या मदतीस धावत आल्या व त्यांनी फ्रेंच व मराठे यांच्यामधील वैर दात बुडवून, उभयतांचा स्नेहभाव जुळवून आणिला ।

 छत्रपति शाहू याच्या आज्ञेनें रघुजी भोसले यानें इ० सन १७३९ मध्ये कर्नाटक प्रांतावर स्वारी केली; व रघुजी आणि चातर्फे इनास यन्यिामध्ये पत्रव्य बहार होऊन ( इ० सन १७४० ) पुढे रघूजीने चंदासाहेबास कैद करून सातारा येथें पाठविलें (ता. २१ मार्च इ. सन १७४१ ) व फ्रेंचाकडे खंडणीचा तगादा लावला. परंतु याच संधीस रघूजीनें आपला वकील पडिचरी येथे पाठविला होता; त्याचा डूमास या अतीशय आदरसत्कार केला, त्यास पांडेचरी येथील आपला उत्तम बंदोबस्त दाखविला व तो परत जाण्यास निघाला तेव्हां त्यापाशीं रघुजी भोंसल्यास " ह्मणून, डूमास याने, फ्रान्समधील उत्कृष्ट व उंची दारूच्या दहा बाटल्या पाठविल्या. या बाटल्यातील दारू रघुजीच्या बायकोस इतकी आवडली की, तिच्या आग्रहावरून रघूजी " नजर " आणखी बाटल्या पाठविण्याविषयी " डूमास यास कळविलें; तेव्हां डूमास यानें तशाच प्रकारच्या आणखी दारूच्या तीस घाटल्या व औपचारिक पत्रे रघूजीकडे लागलीच रवाना केली; अर्थात्, या दारूच्या बाटल्या मिळाल्याबरोबर रघूजी भोसले पूर्णपणे खुष होऊन गेला; त्यामुळे रघुजी-डुमास यांचा स्नेह झाला. मराठे - फ्रेंच यांच्यात सख्य झाले; खंडणी दारूत बुडाली आणि पांडचरसि बिलकुल इजा देऊं नये " अशी आपल्या सैन्यास ताकीद देऊन आणि आपल्या पूर्वीच्या सर्व मागण्या | सोडून देऊन तो माहीमकडे निघून गेला व फ्रेंचांवरील हे मराठ्यांचे अरिष्ट अशारीतीनें आपोआप नाहीसे झाले, यावरून दारूच्या बाटलीचा केवढा प्रभाव आहे, हे सहज प्यानी येतें ।