Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६४६ )

काही महिने लोटल्यावर त्यास वेढा उठवून परत जाणे भाग पडले; त्याप्रमाणेच विजापूरकर अली आदिलशहा ( कारकीर्द इ० सन १५५७-१५८०) याने गोवें शहरास वेढा देऊन तें हस्तगत करून घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचाही पोर्तुगीज लोकांनी पराभव केला व त्यास वेढा उठवून परत जाणे भाग पाडिलें. ( इ० सन १५७० ) त्याप्रमाणें होनावर येथील राजाने आदिलशहास मदत केल्यामुळे आधेड यानें तिकडे स्वारी करून तें शहर जाळून टाकिलें, यावेळेपर्यंत पुष्कळच प्रदेश पोर्तुगीज लोकांच्या ताब्यांत आला होता ह्मणून आफ्रिकेच्या किनान्यापासून मलाकापर्यंतच्या प्रदेशाचे तीन विभाग करण्यांत आले; त्यांपैकीं एडनपासून सिलोनपर्यंतचा मुख्य विभाग गोवें येथील अधिकान्याच्या ताब्यांत देऊन त्यास व्हाईसराय ही पदवी देण्यांत आली, आणि गोवें हेंच त्याचें राहण्याचे मुख्य ठिकाण ठरविण्यांत आलें. सिलोनपासून मलकापर्यंत दुसरा विभाग ठरविण्यांत येऊन त्याचे मल्लाका हैं राहण्याचे मुख्य ठिकाण करण्यांत आलें; आणि आफ्रिकेचा पूर्वकिनारा हा तिसरा विभाग करून त्याचें मुख्य शहर मोझांबिक ठरविण्यांत आलें. पुढें लवकरच ह्मणजे इ. सन १५८० मध्ये पोर्तुगाल देश स्पेन देशास जोडला गेल्यामुळे तेथील कारभारास स्पेनचा अरेरावी व बलाढ्य राजा दुसरा फिलीप याच्या लहरीप्रमाणे वळण लागत गेलें, आणि पोर्तुगीज लोकांची कर्तबगारी त्याच्या लोखंडी पंजासाली चिरडून पार नामशेष झाली.

 अशारीतीनें हिंदुस्थानचा व्यापार अनायासेंच स्पेनदेशाच्या हातांत आला; परंतु त्या देशाचा व्यापार हा मुख्यत्वेंकरून तेथील सरकारच्या मालकीचा असे; आणि त्यांचा उद्देश प्राधान्येकरून सोनें व रूपें यांच्या खाणी मिळविण्याचा असल्याने त्यांची प्रवृत्ति व्यापारापेक्षां देश जिंकण्याकडेतच अधीक असे; त्यामुळे हिंदुस्थानांत व्यापाराकरितां लांबच्या सफरी करणे त्यांना पसंत नसून अमेरिकेत मौल्यवान धातू मिळविण्याकरितां खाणी खणणेंच त्यांना अधीक इष्ट वाटत असे. मध्यंतरी इ० सन १५७९ मध्ये हॉलंड च बेलजम मिळूनच्या ज्या भागास पूर्वी नेदरलॅंड असें ह्मणत असत, त्याचे उत्तर व दक्षिण नेदरलंड हे दोन भाग झाले; आणि इंग्लंडने डच लोकांच्या लोकसत्तात्मक राज्याचे स्वातंत्र्य कबूल केलें, त्यामुळे स्पेनच्या ताब्यांत असलेल्या आशियाखंडांतील पोर्तुगीज लोकांच्या वसाहतींवर इंग्लंड व हॉलंड या दोन्हीं देशांचीं आरमारें पाठविण्यांत आली व त्यांनी पोर्तुगीज लोकांचा अतीशय नाश केला. पुढे फिलीप यानें इ० सन १५८८ मध्ये इंग्लंडवर एक मोठे आरमार पाठविलें; परंतु त्यांत त्याचा पराजय होऊन इंग्लंडला निर्णयात्मक जय मिळाला, शिवाय पोर्तुगीज लोकांचीं व्यापारी जहाजें मधून मधून इंग्रजलोक पकडीत व ..त्यावरील माल इंग्लंडमध्ये नेऊन विकून त्यावर अतीशय नफा मिळवीत. त्यामुळे पूर्वेकडील