Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२४४)

सरदार मारले गेले व अखेरीस मुसलमानी सैन्यास दीव येथील वेढा उठवून परत निघून भाग पडलें. त्यानंतर जान कॅस्ट्रो यानें किल्याची अतीशय पडझड झाली असल्यामें त्याची दुरुस्ती केली व सांपत्तिक मदतीची अत्यावश्यकता असल्यामुळे त्यानें गोवें येथून २० हजार पदांची (पर्दा हैं त्याकाळी रुपयाचे एक नाणें ह्मणून असून त्याची किंमत अजमातें सव्वा रुपया होती. ) मदत मागितली, ती गोर्वे येथील लोकांनीच आपसात जमवून त्याच्याकडे पाठविली व गोवें येथें परत आल्यावर त्याचा अतीशय मानसन्मान करण्यात आला. स्थानंतर कॅस्ट्रो यानें विजापूरकराशी युद्ध करून दाभोळ हे प्रसिद्ध बंदर आपल्या हस्तगत करून घेतले व त्यांच्याशी तह केला. ( इ० सन १५४७ ) कॅस्ट्रो याच्या विजयाची बातमी पोर्तुगालमध्ये पोहोचल्यावर राजानें त्यास शाबासकी व इनामें पाठविली व पुढे तीन वर्षेपर्यंत त्याची पुन्हा " व्हाईसरॉय " ह्मणून नेमणूक केली, हा खलिता जेव्हां गोवें येथें येऊन पोहोचला त्यावेळी कॅस्ट्रो हा मृत्युशय्येवर पडलेला होता; तो हणाला:-" मी तर आतां या जगाचा घटका अर्ध घटकेचाच काय तो सोबती 'आहे; पण मला पुन्हा तीन वर्षे व्हॉईसरॉय नेमण्यात आले आहे, हा या मिथ्या जगांतील कसा विचित्र खेळ आहे पहा. " आणि त्यानंतर लवकरच त्याचे प्राणोत्क्रमण झालें. ( इ० सन १५४८ ) दीव काबीज केल्याबद्दल या पुरुषाची आजतागायत कीर्ति कायम आहे.

 कॅस्ट्रो नंतर गार्शिया इसा या नांवाचा मनुष्य गव्हर्नर ह्मणून नेमण्यात आला.- पोर्तुगीज अमदानीत गव्हर्नर व व्हाईसराय यांच्या नेमणुका परस्परन्यिा जागांवर होत असत; परंतु उभयतांचे अधिकारक्षेत्र भिन्न असे. - त्यानें गुजराथचा सुलतान दुसरा महंमदशहा ( कारकीर्द ६० सन १५३६ ते ३० सन १५५४ ) यांच्याबरोबर तह करून दीवचा किल्ला कायमचा पोर्तुगीज लोकांकडे घेतला, आणि त्याबरोबरच किल्ल्याच्या बाहेरील सर्व प्रदेश सुलतानाच्या ताब्यांतील आहे असे ठरलें. गार्शियानंतर ( इ० सन १५४९ ) जार्ज काबाल हा गव्हर्नर ह्मणून व त्याच्यानंतर अफान्सो ड नोरोन्हा हा व्हाईसराय ह्मणून हिंदुस्थानांत आला यानें सिलोन बेटांत पोर्तुगीज लोकांच्या सत्तेवा विस्तार केला; त्याच्यानंतर ( इ० सन १५५४ ) फ्रान्सिस्को चारेटो हा गव्हर्नर व त्याच्या मागून कान्स्टाटीनो ड बागांझा हा व्हाईसराय आला; त्यानें दमण काबीज करून घेऊन तेथे एक मजबूत किल्ला बांधिला आणि मलाका, भोर्मझ, सिलोन वगैरे ठिकाणीं आपले आरमार पाठवून तिकडील प्रदेशाचा बंदोबस्त व मजबुती केली व स्वतः सिलोन- मध्ये जाऊन तिकडील जाफनापट्टण हे महत्वाचे ठिकाण हस्तगत करून घेतलें. त्याच्यानंतर फ्रान्सिस्को कूटिन्हो हा ( इ० सन १५६१ पासून ) व त्यानें तीन वर्षे कारभार केल्यावर इ० सन १५६४ पासून एन्टोड नोरोन्हा हा व्हाईसरायहणून हिंदुस्थानात आला. याच्या कारकीर्दीत मुसलमान राजेरजवान्यांनी एकत्र होऊन