किल्ला बांधिला आणि सुमात्रा, पेगू, सयाम, कोचीन, चीन वगैरे ठिकाणच्या अधि- कान्यांशी सख्यत्व संपादन करून तो गोवे येथे परत आला. ( इ० सन १५०९ ) इनक्यति अदिलशाही सरदार पोलादखान यानें गोवे हस्तगत करून घेण्याचा प्रयत्न सुरू केला; परंतु तो यशश्वी होत नाहीं असे पाहून विजापूर दरबारांतून रसूलखान या नांगचा दुसरा सरदार गोवे शहरावर चाल करून आला व त्यानें तें हस्तगतही करून घेतले; परंतु याच संधीत पोर्तुगालमधून कुमक आल्यामुळे आल्बुकर्क यानें त्याच्याशी युद्ध करून गोवा शहर पुन्हां हस्तगत करून घेतलें. ( इ० सन १५१२ ) त्यानंतर इ० सन १५१५ मध्ये त्याने इराणी आखातातील प्रसिद्ध ओम हैं बेट आपल्या हस्तगत करून घेतले व तिकडून परत येत असतां मार्गातच दिजंबर महिन्यांत तो मृत्यू पावला.
बुकर्क हा जिवंत असतांनाच त्याच्या जागी अल्बर्गारिया या नांवाच्या एका मोठ्या घराण्यांतील मनुष्याची नेमणूक झाली होती. तो अल्बुकर्कसारखा कर्तृत्ववान् नव्हता; तथापि त्यानें सिलोनवर स्वारी करून तेथील राजाजवळून खंडणी घेऊन तिकडे एक किल्ला बांधला. त्याच्या नंतर इ० सन १५१८ च्या अखेरीस लोपेझ सीक्वेरा व नंतर ( इ० सन १५२१ ) मेनेझीत व त्यानंतर प्रसिद्ध वास्कोड गामा हे व्हॉईसराय ह्मणून हिंदुस्थानांत आगामा हा वृद्ध असून हिंदुस्थानांत आल्यावर ( इ० सन १५२४ ) लवकरच ह्मणजे दिजेंचर महिन्यांत मृत्यू पावला; नंतर इ० सन १५२६ पर्यंत डॉम हेन्री डीमॅझीस व स्वानंतर इ० सन १५२९ पर्यंत लोपोन्हाज डी सांपेयो यांच्या नेमणुका झाल्या व स्वानंतर प्रतिद्ध न्यनोडा कुन्हा हा हिंदुस्थानांत पोर्तुगीज व्हॉईसराय ह्मणून आला. ( इ० सन १५२९ ) हा पुरुष मोठा पराक्रमी व कर्तृत्ववान् असून पोर्तुगीज लोकांच्या दृष्टीने याची कारकीर्द विशेष महत्वाची ह्मणून मानिली गेलेली आहे.
नोड कुन्हा हा प्रसिद्ध नौकानयनाखवेत्ता व दर्यासारंग ट्रिस्ट्रॉमड कून्हा याचा मुलगा असून तो विशेष दुबार व पुढे आलेला होता; अटलांटिक महासागरांत ट्रिस्ट्राम बेटे आहेत त्यांना याच दर्यासारंगच्या सन्मानार्थ " ट्रिस्ट्राम " हें नांव दिलेले आहे. वनोड कून्हा हा लिस्बन येथून निघाला त्याचवेळी त्यास दीववर हल्ला करून तें हस्तगत करून घेण्याचल बजाविण्यांत आले होते. स्वामार्णे चारों जहाजे व वीस हजारांवर सैन्य-त्यापैकी पांच हजार युरोपियन होते.- बरोबर घेऊन तो पहिल्याने मुंबई बंदरांत आला; तेथे या आरमाराची सर्वसाधारण पाहणी करण्यांत आली, ( इ० सन १५३१ ) व नंतर कुन्हा हा या सर्व आरमारासह दीव बंदरावर चाल करून गेला. जातांना मार्गातील दमण हे बंदर त्याने हस्तगत करून घेतलें पुढे जाऊन दीवला