Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४१ )

वेढा दिला व ते बंदर हस्तगत करून घेण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; परंतु तेथील तटबंदी विशेष मजबूत असून त्या बंदराच्या संरक्षणाची व प्रतिकाराची उत्तम तजवीज करण्यांत आली होती, त्यामुळे त्यास दविचा वेढा उठवून परत फिरणे भाग पडले; परत येतांना या आरमाराने गोगो, महुवा, बलसाड, सुरत, आगाशी, तारापूर, वसई वगैरे शहरें हस्तगत करून त्यांचा नाश केला व ते गोवें येथें परत आले.

 तथापि काही झाले तरी दीववर पुन्हां चढाई करून जाऊन ते हस्तगत करून घ्यावे, असा न्यनो डा कुन्हा याचा निश्चय झालेला होता, इतक्यांतच राजकीय वातावरणांत पोर्तुगीज लोकांस अनुकूळ असें निराळेंच स्थित्यंतर अकल्पितरीत्या घडून आले. गुजराथचा राज्यकर्ता दुसरा मुज्करशहा ( इ० सन १५११ ते १५२६ ) याचा मुलगा बहादूरशहा ( इ० सन १५२६ ते ३० सन १५३६ ) हा यावेळी गादीवर होता. त्याने दुमायून विरुद्ध अनेक खटपटी केल्या; खुरासानच्या सुलतानाचा नातू महमद जमान हा हुमायूनचा आश्रय सोडून बहादूरशहा याजकडेस गेला असतां त्यास स्यानें आश्रय दिला; हुमायूनचा मेहुणा महंमद जमान मिर्झा हा हुमायून विरुद्ध बंड करून गुजराथेंत पळाला; त्यासही बहादूरशहाने आश्रय देऊन मोठ्या सन्मानास चढ- विलें, हुमायूनचा शत्रू अल्लाउद्दीन लोदी यास हुमायूनबरोबर युद्ध करण्याकरितां मुबलक द्रव्य दिले व चोहोंकडून हुमायूनला त्याने त्रासवून सोडिलें; तेव्हां हुमायून हा बहादूर- शावर चाल करून गुजराथेंत आला. गुजराथांत हस्तगत करून घेतला; त्याचा पिच्छा पुरवून मांडवगड व तेथून चांपानेरकडे त्यास पिटाळून लावले व तेथेही निभाव न लागल्या- मुळे अखेरीस तो दीव येथें पोर्तुगीज लोकांच्या आश्रयाखाली गेला व पुन्हा राज्यपद परत मिळविण्याकरिता त्यांची मदत मागितली; त्या ऐवजी त्यानें दीव येथे पोर्तुगीज लोकांना किल्ला बांधण्याची परवानगी दिली व कुन्हा व बहादूरशहा यांच्यामध्ये तह होऊन ( इ० सन १५३५ ) त्याने किल्ला बांधण्याची दिलेली परवानगी कायम केली व वसई हैं ठिकाण, मुंबई या ताब्यांतील प्रदेशासह पोर्तुगीज लोकांस दिलें. त्याप्रमाणे पोर्तुगीज "लोकांनी ताबडतोब दीव येथें किल्ला बांधिला; वसई व आसपासचा प्रदेश ताब्यांत घेतला व बहादूरशहास पुन्हा राज्यावर स्थानापन्न केले.

 तथापि स्थानंतर बहादूरशहास, " आपण पोर्तुगीज लोकांना दीव येथे किल्ला बांधण्याची परवानगी दिली " याबद्दल पश्चात्ताप वाटू लागला व तेथून पोर्तुगीज लोकांना हांकलून देण्याचा निश्चय करून त्याने न्यानो यास आपल्या भेटीस बोलाविले; परंतु बहादूर- शहाचे कपट अगाऊच जाणून त्यानें " आपण आजारी आहोंत " अशी सबब दाखवून शहाच्या भेटीस जाण्याचे टाळिलें; तेव्हां बहादूरशहा हा स्वतःच न्यनोच्या भेटीकरितां त्याच्या
३१