याच्याबरोबर आठ जहाजांवें आरमार देऊन त्या जोड आरमाराचा प्रतिकार करण्यास पाठविलें. ह्रीं दोन्हीं आरमारे ६० सन १५०७ मध्यें, चौल येथे भेटून उभयतांमध्यें मोठ्या निकराचा सामना झाला; यावेळीं मुसलमान लोकांचा पूर्ण पराजय होण्याची अगदी वेळ आली होती; परंतु इतक्यांतच मलिक हा स्वतः आरमारी जहाजासह तेथें येऊन दाखल झाला; त्यामुळे लढाईचे पारडे एकदम फिरून गेलें; तिसन्या दिवशीं पोर्तुगीज आरमारी अधिकारी, " आतां यापुढें युद्ध सुरू ठेवू नये" असे सांगत असताही त्यांचे न ऐकतां लोरेंको यानें पुन्हा युद्ध सुरूं केलें, त्यावेळीं शत्रु आरमारांतील एका तोफेचा गोळा त्याच्या मांडीस लागून तो भयंकर जखमी झाला. त्यावेळी आपले लोक नाउमेद होऊ नयेत, झणून त्यानें आपल्या जहाजाच्या मुख्य शिडास आपणाला बांधवून घेतले व इतक्या भयंकर व शरिरतिील अतीशय रक्त गेल्यामुळे गळून गेलेल्या स्थितीतही तो आपल्या लोकांस निकराने युद्ध करण्याविषयीं सारखे उत्तेजन देत होता. इतक्यात तोफेचा दुसरा गोळा येऊन त्याने लोको याचा तात्काळ प्राण घेतला व अशारीतीने या युद्धांत पोर्तुगीज लोकांचा पराभव होऊन मुसलमानांना विजय प्राप्त झाला.
तथापि आलिमडा हा आपल्या मुलाच्या मृत्यूचा सूड घेण्याकरितां मोठ्या जोराने दीववर चाल करून आला; मलिक आयाशी मोठ्या निकराचा युद्धसंग्राम केला व त्याचा पूर्ण पराजय करून त्याचे तीन हजार लोक ठार मारिले. अशारीतीनें मुस- लमानांचा नाश करून तो कोचीन येथें परन आला व इ० सन १५०९ च्या नोव्हेंबरच्या महिन्यांत लिसबन येथे परत जात असतां आफ्रिकेच्या किनान्यावर एका चकमकीत मारला गेला. अल्मिडाच्या जागी आल्काझोडी छाल्बुकर्क याची नेमणूक झाली व त्याप्रमाणे लीस्वन येथून तो हिंदुस्थानांत येऊन दाखल झाला; तथापि आल्मिडा यानें मुसलमानांवर चढाई करून त्यांचा नाश करून परत आल्यावर आपल्या जागेचा हक्क सोडला, तेव्हां तो "व्हॉईसरॉय" या हुद्यावर स्थानापन्न झाला.
अल्बुकर्क हा मोठा शूर व मुत्सदी पुरुष असून त्यानेंच हिंदुस्थानात पोर्तुगीज लोकांना स्थाईकत्व आणून दिलें. त्याने विजापूरकरांच्या ताब्यांतील गोवे या महत्त्वाच्या बंदरावर चढाई केली. बंदराच्या नाक्याशी असलेला पणजोबा किल्ला हस्तगत करून घेतला. ( तारीख १ मार्च इ० सन १५१० ) आणि लागलीच दोनच दिवसांनी गोवे है शहर हस्तगत करून घेतले. त्यानंतर यूसफ अदिलशहाने परत मिळविण्याकरिता मोठ्या जोराचा प्रयत्न केला; परंतु तो निष्फळ होऊन तें शहर पोर्तुगीज लोकांच्याच ताब्यांत राहिले. त्यानंतर त्याने मला आपल्या ताब्यांत घेऊन तेथे एक मजबूत