हिंदुस्थानांत आलेला आणि चंद्रगुप्ताकडे पाटलीपुत्र येथें सेल्यूकसने पाठविलेला प्रसिद्ध वकील मेगास्तनीस याच पहिल्या युरोपियन मनुष्यानें भागीरथी नदी व तिच्या कांडचा सुपीक प्रदेश पाहून उत्त हिंदुस्थानांतील सुसंपन्न व समृद्ध स्थितीची माहिती युरोप खंडांत पहिल्यानें नेऊन तिचा प्रसार केला; त्यानंतर साव्या शतकांत कॉस्मास व त्यानंतर मार्कोपोलो यांनी आशियाखंडाची माहिती मिळवून तिचा युरोपति प्रसार केला; तसेंच मॉर सोवार या नांवाचा एक युरोपियन इ० सन ८२२ मध्ये बाबीलोन- हून हिंदुस्थानांत केरळ देशातील कोलम येथें, आपल्या ख्रिस्ती बांधवांची व्यवस्था लावून घेण्याकरितां आला होता व त्याप्रमाणे तेथील पेरूमाळ घराण्यांतील राज्यकर्त्यांकडून वाने त्यांची व्यवस्था लावून घेतली; आणि त्याप्रमाणेच इराण व मेसापोटेमिया येथील नेस्टोरियन व खाल्डियन धर्मोपदेशकांनी तिबेट, तार्तरी इत्यादि देशांसुद्धां सर्व आशिया- खंडभर प्रवास करून धर्मप्रसार केल्यावर ते दक्षिणहिंदुस्थानांत येऊन तिकडेही त्यांनी धर्मप्रसार केला, अशी पूर्व माहिती मिळते; वास्कोदिगामा हा कालीकोट येथे आला त्यावेळीं ते
बंदर अतिशय भरभराटीत असून हिंदुस्थानचा पश्चिम किनान्यावरून युरोप खंडाशीं चालणारा व्यापार इजिप्तमधून चालत होता; व अजमासें सहारों वर्षापासून तो सर्वस्वी आरबलोकांच्या ताब्यांत असून याच व्यापारावर ते अतीय श्रीमान् झाले होते; त्यामुळे भावी काळांत आपला व्यापार बळकावूं पाहणान्या पोर्तुगीज लोकांच्या उद्योगांत त्यांनीं अनेक अडथळे आणिले; तथापि गामानें ते सर्व निष्फळ करून कालीकोट येथील झामोरीन राजाची भेट घेतली व कानपूर येथील राजात भेटून, साध्याशी व्यापारी तह करून जिन्नत बरोबर घेऊन तो २० नोव्हेंबर १४९४ रोजी परत युरोपांत जाण्यास निघून ता० १८ सप्टेंबर इ० सन १४९९ रोजीं तो पोर्तुगालची राजधानी लेस्चन येथें सुरक्षित जाऊन पोहोचला.
पोर्तुगाल देशानें अज्ञात प्रदेशाचे शोध लाविल्यामुळे युरोपियन राष्ट्रांच्या दृष्टीनें अत्यंत महत्वाचे पराव्या शतकाच्या अखेरीस विलक्षण स्थित्यंतर घडून आलें. 'या शतकाच्या अखेरीस जगांतील व्यापारी इतिहासान अकल्पित आणि बहुतेक एकाच वेळी दोन अत्यंत महत्या गोष्टी घडून आल्या, त्यांनी पहिली अमेरिका खंडाचा शोध व दुसरी केप ऑफ गुड होपला वळसा घालून जाता येतां येण्याच्या रस्त्याची माहिती ही होय. या दोन महत्वाच्या शोधांमुळे आशियाखंडाशी -- मुख्यत्वेकरून आशियाखंडाच्या अमेय भागांतील संपत्तिमान् व समृद्ध देशाशीं व विशेषतः हिंदुस्थान व मलाया द्वीपसमुच्च- यांतील बेटांशी - जलमार्गाने चाललेला व्यापार अतीशय वाढला. आशियाखंडाच्या दक्षिणे- कडील आणि आटलांटिक महासागराच्या किनान्यावरील देशांत जलमार्गाने सरळ दळणवळण