रॉड्रिग्स बोरजिया यानें अज्ञात व नवीन मिळालेल्या आणि मिळणा-या देशांचल आज्ञापत्र काढिलें याच्यापूर्वी इ० सन १४५४ मध्ये पांचव्या निकोलस पोपनें “आफ्रिकेच्या दक्षिणेकडील प्रदेशांवर पोर्तुगालची मालकी आहे; " असे आज्ञापत्र काढिलें होते; त्यामुळे यावेळी स्पेनच्या राणीनें आपल्यातर्फे आज्ञापत्र काढण्याविषयीं पोपला विनंति केली. त्यावरून नवीन आज्ञापत्राअन्वयें " स्पेनला मागें झालेले व पुढे होणारे पश्चिमेकडील शोध लागलेल्या व लागणान्या देशांची ओस व केपव्हर्ड या बेटांच्या पश्यनेस शंभर लीग -लणजे अजमासे ३५० मैल वर एक दक्षिणोत्तर रेषा आखून त्याचे पश्चिमेकडील भाग स्पेनला व पूर्वेकडील पोर्तुगालला अशी वाटणी केली. ( इ० सन १४९३ ) कोलंबसाप्रमाणेच बाधिलोमोडिअस याने इ० सन १४८६ च्या आगष्ट महिन्यामध्ये पोर्तुगालची राजधानी लिसबन येथून निघून " केप ऑफ गुड होप " ला वळसा घातला, व इ० सन १४८७ च्या दिजंचर महिन्यामध्ये परत येऊन " केप ऑप "गुड होप " ला वळसा घालून हिंदी महासागराकडे जाण्याला मार्ग आहे" असें सिद्ध केलें. पुढे इ. सन १४९२ मध्ये कोलंबसाने वेस्टइंडीज बेटांचा शोध लावला; त्यामुळे स्पेन आणि पोर्तुगाल यांच्यामध्ये नवीन देशांचे शोध लावण्याकरितां पृथ्वीची विभागणी "टारडेसलाज " च्या तहान्वये, ता० जून इ० सन १४९४ रोजी करण्यांत आली; स्वामुळे ता० ४ मे इ० सन १४९३ रोजी पोप आलेक्झांडर यानें काहिलेल्या आज्ञापत्राप्रमाणे झालेल्या विभागणीत थोडासा फरक झाला; व त्याअन्वयें केप- कच्या पश्चिनेत ३१० लीगवर उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत कल्पिलेल्या रेषेच्या पूर्वेकडील शोध लागलेले व पुढे लागणारे देश पोर्तुगालला मिळाले व पश्चिमेकडील स्पेन देशास मिळाले.
त्यानंतर इ० सन १४९५ मध्ये पोर्तुगालचा राजा जॉन हा मृत्यू पावला त्याचा मुलगा इमान्युअल हा गादीवर आला. याच्याच कारकीर्दीत वास्कोदिगामा आणि त्याचा भाऊ पोलो दि गामा हे दोघे बरोबर अजमातें दोनशे माणसें घेऊन तीन गलबतांसह ता० ८ जुलाई इ० सन १४९७ रोजी लिप्सचन येथून निघाले; आणि इ० सन १४९८ च्या आगष्ट महिन्याच्या २५ व्या तारखेत मलबार किनान्यावरील कालीकोट बंदरात येऊन उतरले, हीच पोर्तुगीज लोकांची-ज्ञणजे युरोपियन लोकांची हिंदुस्थानांत मलबारच्या किनान्यावर पहिली रुफर होय; तथापि याच्यापूर्वीही हिंदुस्थाना- वर युरोपियन लोकांच्या अनेक स्वाच्या इ० सनापूर्वी २०३४ या वर्षापासून झालेल्या आहेत; ( भाग पहिला पान १६ पहा. ) शिवाय अनेक युरोपियन प्रवासीही फार पूर्व काळासून हिंदुस्थानांत येऊन गेलेले आहेत. त्यापैकी शिकंदर बादशहाच्या स्वारीबरोबर
३०