चालण्यांचे नवे रस्ते शोधून काढल्यामुळे व्यापाराचा मुख्य और तिकडे वळला; आणि आशिया खंडांत उत्पन्न झालेल्या जिनसांच्या ऐवजीं सोनें व रूपें देतां यावें ह्मणून त्याचा अतीशय पुरवठा वाढत गेला. पृथ्वीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील देशाचे नवीन शोध 'लागल्यामुळे जलपर्यटनाचें काम मोठ्या प्रमाणावर वाढले, आणि त्यावेळेपासून युरोपस्थ लोकांनी आपले श्रेष्ठ प्रकारचे कौशल्य, धाडशी स्वभाव व भांडवल, यांच्या योगानें मोठ- मोठ्या समुद्रावरील व्यापाराचा मक्ता आपल्या हात ठेविला आहे. या नवीन धाडसाच्या कामामध्ये वर्चस्व मिळविण्याकरितां युरोपियन राष्ट्रांची आपसांत लवकरच मोठी निकराची स्पर्धा सुरू झाली. पोप अलेक्झांडर बोरजिया याने आज्ञापत्र काढून स्पेन व पोर्तुगाल या देशांमध्ये ख्रिस्तीधर्मेतर सर्व अज्ञातदेश वाटून दिले; स्यति हिंदुस्थान देश पोर्तुगालला दिला. त्यामुळे आफ्रिकेच्या पश्चिम किनान्यावर दक्षिणेकडेस आपला राज्यविस्तार सर्व पंधराव्या शतकभर रेटीत नेणाच्या पोर्तुगीज लोकांनीं तो झपाट्याने वाढविण्याची सुरुवात केली. त्यांनी हिंदुस्थानच्या किनान्यावर किल्ले बांधून वसाहत करण्याला, हिंदीमहा- सागरांतील महत्वाची ठाणी आपल्या ताब्यांत घेण्याला, आणि आलेक्झांड्रिया व कान्स्टट नोपल येथील मुसलमान बादशाहानी हिंदी महासागरांमधील युरोपियन लोकांचे वर्चस्व कमी करण्याचा केलेला प्रयत्न हाणून पाडण्याला आपल्या जिवाकडे न पाहतां मोठ्या आवेशाने सुरुवात केली. आपल्या वैभवाच्या शिखरावर असतांना युरोपांतील तुर्कस्थानचा सुलतान सुलेमान धी मॅमीफिशंट याने हिंदी महासागरामधून पोर्तुगीज लोकांना घालवून देण्याचे जे प्रयत्न केले तेही सर्व निळ झाले, ही मोठ्या सुदेवाचीच गोष्ट समजली पाहिजे; आणि जर हा तुर्कस्थानचा वैभवशाली सुलतान यशस्वी झाला असता तर ख्रिस्ती राष्ट्रांना पूर्वेकडे राज्यविस्तार करण्याला मोठा धोका आला असता. कारण त्याची सत्ता सोळाव्या शत- काच्या प्रारंभी तांबडा समुद्र आणि इराणी आखात ह्यांमध्ये अचावित होती; त्याचे आरमार मूमध्य समुद्रामध्ये निर्भयपणें संचार करीत होते; आणि इजिप्त व सीरिया या देशांमधून हिंदुस्थानाशी व्यापार करण्याचा जुना व सरळ मार्ग जर तुर्कस्थानला आपल्या हातीं ठेवितां आला असता, तर यावर मिळविलेल्या संपत्तीच्या योगानें त्याचें सैन्यबळ व आरमारी ससा ही प्रचंड वाढली असती. तुर्की राष्ट्रानेच नव्हे, पण बास्फरसच्या सामुद्रधुनीवरील इतर कोणत्याही अवाढव्य लष्करी राष्ट्राने आशियाखंडांतील व्यापाराचे मार्ग आपल्या ताब्यात ठेवून हल्लींच्या या आमदानीत सुद्धां अर्ध्या युरोपखंडावर आपला दरारा बसविला - असता, आणि तीनशे वर्षापूर्वी तर ते अजिंक्यच झालें असतें, तथापि या सरळ समुद्र- मार्गाने व्यापार चालू झाल्यास आपल्या व्यापाराला फार मोठा धक्का बसेल, हें भविष्य जेव्हां हेनीशियन लोकांस कळून चुकले तेव्हां स्यानों तुर्कस्थानच्या सुलतानाला मोठ्या
पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२६२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३५ )