तथापि व्हेनीशियन लोकांनी पूर्वेकडील व्यापार आपल्या हातांत ठेवण्याकरिता पुष्कळच धडपड केली; व तुर्क लोकांविरुद्ध ख्रिस्ती राष्ट्रास त्यांनी मोठ्या नेटाने मदत केली; परंतु तीच गोष्ट नीस शहराचा अपकर्ष होण्यास कारणीभूत झाली; त्यांच्या हातांतून मौल्यवान् सायप्रस बेट नाहींसें झाले; त्यानंतर इ० सन १६४५ मध्ये तुर्क लोकांनी कटिबेटावर हल्ला केला; परंतु यावेळी व्हीशियन लोकांनी, हे बेट आपल्या ताब्यांत ठेवण्याकरितां तुर्क लोकांबरोबर सतत चोवीस वर्षे मोठ्या निश्चयाने झगडा केला. या युद्धाचा बहुतेक भाग " कँडिया शहराच्या वेढ्यामध्ये गेल्याने त्याला “ कँडियाचे युद्ध " असेही ह्मणतात. या युद्धांत व्हेनीशियन लोकांना फ्रान्स, स्पेन, इंग्लंड व सेव्हॉय था देशांतील स्वयंसेवक मंडळीचीही मदत मिळाली होती; परंतु त्याचा काहीही उपयोग न होता ते शहर व सर्व बेट तुर्कलोकांच्या हस्तगत झालें. (इ० सन १६६९ ) पुढे इ० सन १६८४ मध्यें तुर्क लोकांचें, बादशहा लिओपोल्ड व पोल लोक यांचबरोबर युद्ध सुरू झाले; त्या संधीचा फायदा घेऊन व्हेनीशियन लोक तुर्क लोकांविरुद्ध त्यांना मिळाले; आणि सेना - पति फ्रान्सिस्को मॉरोसीनी यानें पिला पानीसस आपल्या हस्तगत करून घेतलें. अशा कमानें त्यांचा -हास होत गेला, आणि अलेरीस इ० सन १७१८ मध्ये पॉसारोवस येथे तह होऊन, इ० सन १९०४ पासून व्हेनीशियन लोकांचा चालू असलेला युद्धविषयक इतिहास समाप्त झाला.
२ पोर्तुगीज : - पोर्तुगाल हा देश युरोपखंडाच्या नैऋत्य कोपन्यांत असून तो इ० सन ११५८ मध्ये आल्फान्सो हेनरी या नांवाच्या एका शूर पुरुषानें मुसलसान लोकांपासून हस्तगत करून घेतला; तरी पुढे १२० वर्षे अनेक युद्धे होत राहून अखेरीस इ० सन १२७९ मध्यें पोर्तुगाल देश स्वतंत्र झाला; तथापि पोर्तुगाल देशाच्या महत्वाच्या राजकीय इतिहासास इ० सन १३८५ पासून सुरुवात होत असून पहिला जॉन अथवा जान भी पेट हा पोर्तुगाल देशाचा पहिला राज्यकर्ता होय, आणि याच काळापासून इ० सन १५८० पर्यंत, ह्मणजे स्पेनच्या दुसन्या - फिलीपनें तो देश स्पेन देशास जोडीपर्यंत, पोर्तुगाल देशाची अतीशय भरभराट झाली; युरोप आणि आशिया या दोन्हींही खंडांत रशियन साम्राज्य पसरून पश्चिम आणि पूर्व देशाची एक सळंग सांखळी जुळविल्याचें श्रेय जसे आजपर्यंत " रशिया " या देशास देण्यांत येत असे, त्याप्रमाणेंच अज्ञात प्रदेशाचा शोध लावण्यांत पूर्वकाळी दाखविलेल्या अपूर्व साहसाबद्दल स्पेन - पोर्तुगालच्या राष्ट्रालाही श्रेय देणे आवश्यक आहे. कोलंबसाला आपल्या जन्मभूमीत आश्रय न मिळाल्यामुळे तो प्रथम पोर्तुगालच्या व नंतर स्पेनच्या राजदरबारी गेला. तेथील राणी इसाबेला हिच्या मदतीने नवीन देशाचा शोध लावण्याला स्थानें दुसरें जलपर्यटण केलें व हिस्पानिओलाचा शोध लाविला, सहावा पोप अलेक्झांक्ड