तिकडे राज्य स्थापन केले, ही असून दुसरी ह्मणजे कोलंबसानें अमेरिका खंड शोधून काढिलें, ही होय व तिसरी ह्मणजे आफ्रिकेच्या दक्षिणटोंकास - " केप ऑफ गुड होप " ला वळसा घालून जाता येतां येण्याच्या मार्गाचा वास्कोडिगामा यानें लाविलेला शोध, ही होय. या शेवटच्या महत्वाच्या शोधामुळे युरोपखंडाचा आशियाखंडाशीं जलमार्गानें चाललेला व्यापार अतीशय वृद्धि पावला; जलपर्यटणें अधिक अधिक होऊं लागलीं; आणि आशिया- खंडाच्या दक्षिणेकडील व अटलांटिक महासागराच्या किनान्यावरील देशांत जलमागीनें सरळ दळणवळण चालण्याच्या नव्या रस्त्याचा शोध लागल्यामुळे व्यापाराचा मुख्य ओघ तिकडे वळून पुढे युरोपियन लोकांत आपसांतच भयंकर स्पर्धा उत्पन्न झाली व त्याचा परिणाम जगाच्या व विशेषतः हिंदुस्थानदेशाच्या इतिहासावर तर कल्पनातीत असाच घडून आला.
मध्यंतरी देनीस व जिनोबा या उभयतां शहरांमध्ये व्यापारी स्पर्धा सुरू असून यांतच आणखी कान्स्टांटिनोपल येथील रोमन सत्तेबरोबरही स्पर्धा सुरू असल्यानें तिचा पाडाव करण्याकरितां जिनोवा शहरानें तुर्की मुसलमानांची मदत मागितली; आणि त्यांनी ती मोठ्या आनंदाने देऊन रोमन बादशाही जिंकिली; पण ते स्वतःच ती बळकावून बसले व त्यांनी इ० सन १४५३ मध्ये कान्स्टाटिनोपल सर केले; तुर्क लोकांचा यशस्वी बादशहा सुलेमान याची सत्ता सोळाव्या शतकाच्या प्रारंभों तांबडा समुद्र व इराणी आखात यांमध्यें अबाधित असून भूमध्य समुद्रामध्ये त्यांचे आरमार निर्भयपणे संचार करीत होते; काव्या समुद्रावरील काफा, सोल्डेया वगैरे ठाणीं व आशियामायनर, मेसापोटेमिया व सीरिया हे प्रदेश त्यांच्या ताब्यांत होते; त्यामुळे पूर्वेकडील व्यापाराचे वरील दोन्हींही मार्ग युरोपियन राष्ट्रांना बंद झाले होते; आणि पुढे मिसरदेश त्यांच्या ताब्यांत गेला, (इ० सन १५२१ ) तेव्हां तर पूर्वेकडील व्यापारी दळणवळणाचा व्हेनीशियन लोकांच्या ताब्यांत असलेला तिसरा मार्गही त्यांना बंद झाला; त्यामुळे इतालियन शहरांच्या भूमध्य समुद्रावरील व हंसा संघाच्या न्हाईन नदीवरील सर्व हालचाली बंद पडल्या. तथापि पुढे पोर्तुगीज लोकांना नवा मार्ग सापडल्यानंतर नीशियन लोक त्यांच्याविरुद्ध तुर्कांना मिळाले व त्यांच्याशी तह करून त्यांच्या राज्यांत व्यापार करण्याच्या काही सवलती मिळविल्या व त्याबरोबरच पोर्तुगीज मालावर जबर जकात बसविण्यांत आली; परंतु त्यामुळेही व्हेनीशियन लोकांचा फारसा फायदा झाला नाही; अथवा पोर्तुगीज लोकांचें व्यापारी वर्चस्वही विशेषसें कभी झाले नाहीं; पुढे व्हेनीशियन लोक पोर्तुगीज लोकांच्या आश्रयाची याचना करूं लागले; परंतु त्यांनीही त्यांना आश्रय दिला नाहीं व पुढे लवकरच व्हेनीस व जिनोवा या दोन्हीही श्रीमान शहराचे व्यापारी महत्व नष्ट होऊन ती नामशेष झाली.