Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३० )


स्पर्धेमुळे, अदूरदर्शीपणानें हल्ला केला, व ग्रीक बादशाही बुडवून लॅटिन घराण्याची स्थापना केली. ( इ० सन १२०४ ) परंतु सत्तावन वर्षातच इ० सन १२६१ मध्ये ते घराणें नष्ट होऊन ग्रीक घराणे पुन्हां अधिकारारूढ झालें; तथापि ग्रीक लोकांची पूर्वेकडील सत्ता नामशेष होत जाऊन आशियाखंडांतील मोल्यवान् व महत्वाचे व्यापारी जिन्नस युरोपमध्ये नेण्याच्या बाबतीत इतालीतील व्हनीस व जिनोबा हीं दोन शहरें महत्वाची मुख्य स्थानें बनलीं, आणि त्यांनी पूर्वेकडील सर्व महत्त्वाचा व्यापार बहुतेक आपल्याच हातांत राखून ठेविला. दक्षिण युरोपांत या दोन्ही शहरांची व्यापारा- मुळे अत्यंत भरभराट होत असतां उत्तरयुरोपांत " हन्सा-लीग " ऊर्फ " हंस संघ " या नावाचा एक संघ निर्माण झाला. डेनमार्क, स्वीडन, नार्वे वगेरे देशांतील पुष्कळ दर्यावर्दी लोक जर्मन व बालटिक समुद्र ह्यांवर चाचेगिरी करून तिकडील व्यापाराला अतिशय उपद्रव देत असत, तो बंद करण्याकरिता या संघाची स्थापना करण्यांत आली होती. हा काळ बन्याच अंदाधुंदीचा असल्यामुळे इ० सन १२४१ मध्ये चर्क आणि ल्यूबेक या दोन शहरांनी एकत्र होऊन आपआपल्या प्रदेशासभोवती बंदोबस्त ठेवण्याचें ठरविलें; त्यानंतर बन्सविक व ब्रेमेन ह्रीं शहरें त्यांना येऊन मिळाली; या काळांत मुसलमान व ख्रिस्ती लोकांमधील धर्मयुद्धामुळे, आशियातील व्यापारी माल युरोपति अधिक प्रमाणाने मोठ्या जोरानें जाऊं लागला; त्यामुळे स्वाभाविकरीत्या व्यापाराला अतिशय तेजी येऊन त्याचें महत्वही विशेषच वृद्धिंगत झाले. या व्यापाररांतील कित्येक बाबतींचा कुलमका या संघाने आपणाकडेसेच राखून ठेविला होता; बलाढ्य बनला होता की, त्यानें त्यामुळे तो अतिशय श्रीमान् होऊन इतका फ्रान्सचा राजा चवथा फिलीप याला इंग्लिशांचा फ्रान्सच्या किनान्यावरील व्यापार बंद करण्यास भाग पाडिलें होतें; व इ० सन १३६९ मध्ये कोपेनहेगेन हैं शहर घेऊन डेनमार्कचे राज्यही विक्रीस काढिलें होतें. या संघाची मुख्य शहरें ल्यूबेक, कलोन स्वीक, आणि डांशिक हीं होती. - या एकाच गोष्टीवरून सुद्धा, आरमार व व्यापार यांचे महत्व, व्यापार हात आणण्याला आरमारी सत्तेची असणारी अत्यावश्यकता, आरमाराचे मूर्तिमंत अस्तित्व भासविण्याकरिता व त्याचा प्रचंड खर्च भागविण्याकरितां थोडक्यांत ह्मणजे सत्ता, संपत्ति व साधनें ह्रीं मिळविण्याकरिता - व्यापारी दळणवळण बिनधोक सुरु ठेवण्याची किती आवश्यकता असते, आणि ह्या सर्वच बाबती किती महत्वाच्या व परस्परावलंबी आहेत, हे पूर्णपर्णे निदर्शनास येतें.

 पंधराव्या शतकांत जगाच्या इतिहासांत तीन अत्यंत महत्वाच्या गोष्टी घडून आल्या. त्यांपैकी पहिली ह्मणजे तुर्क लोकांनी युरोप खंडांत आपला प्रवेश करून घेऊन