हुकमत बसविली; गोडवण व गडमंडली येथील राज्यकत्यांना आपले वर्चस्व मान्य करण्यास भाग पाडलें; आणि भिल्ल, कोळी, लुटारू लोकांचा पूर्णपणे बंदोबस्त करून प्रवासाचे मार्ग निर्भय केले. त्यानें आशीरगडच्या किल्ल्याची अधिक मजबुती केली; चन्हाणपूर शहर नानाप्रकाराने सुशोभित केले; तापी नदीच्या कोठीं आपणांस राहण्या- करितां एक सुंदर राजवाडा बांधिला; शिवाय शहराला तट, भरवस्तीत बाजारांत जुम्मा- मशीद, मृगयामंदिरें व मृगविहारखने, उपवनगृहें व विशेषतः नजीकच्या डोंगरांतून नळाने बांधून सर्व शहरभर खेळविलेले पाणी यामुळे या सुलतानाने आपले नांव अजरामर करून ठेविलें आहे. शिवाय याच सुलतानाच्या कारकीर्दीत कलाकौशल्याला अतीशय उत्तेजन मिळून सोन्याचांदीचें काम, निरनिराळ्या प्रकारची रेशमी व व मलमल वगैरे विणकाम ब-हाणपूर येथे अत्युत्कृष्ट होत असे; व त्यामुळे या शहराच्या व्यापाराला अतीशय भरभराट आली असून सर्व हिंदुस्थानांत या शहराची प्रसिद्धी व लौकिक असे. या सुलतानास, गुजराथचा राज्यकर्ता महंमदशहा बेगडा ( कारकीर्द ६० सन १४५८ - १५११ पर्यंत ) यानें आपणांस, इ० सन १४९९ मध्ये खंडणी देणें भाग पाडले. त्याप्रमाणे आपल्या कारकीर्दीच्या अखेरीपर्थेन तो गुजराथच्या सुलतानास खंडगी पाठवीत असे. अदिलखान हा ३० सन १५०३ मध्ये ब-हाणपूर येथे मृत्यू पावला आणि त्याचा भाऊ दाऊदखान हा गादीवर आला.
हा सुलतान गादीवर आल्यावर त्याने निजामशाही राज्यावर स्वारी करून तिकडील कांहीं प्रदेश मिळविण्याचा विचार केला होता; परंतु तो सिद्धीस जाण्यापूर्वीच निजामशाही सैन्य स्याच्यावर चाल करून आले व त्या सैन्याने त्याचा पराभव करून ध्यास आशीरगड येथे परत जाणे भाग पाडिलें व शेवटीं माळव्याच्या सुलतानाचे अंकितत्व करून व त्याची मदत घेऊन तो या संकटांतून मुक्त झाला. हा सुलतान आठ वर्षे राज्य करून इ० सन १५१० मध्ये मृत्यू पावला.
दाऊदखानाच्या मृत्यूनंतर त्याचा अज्ञान मुलगा ग नलिन हा गादीवर आला; परंतु लवकरच स्थाचा खून झाला व त्यामुळे फरुकी घराण्याचा शेवट झाला; तथापि इतर प्रतिस्पर्धी हकदार पुढे आले; व त्यांच्या आणि त्यांचा पक्ष घेणान्या सत्ताधाऱ्याच्या
टीप १:- मंडला हे शहर, हल्लीं मध्यप्रांतति एक जिल्ह्याचें ठिकाण असून त्यास " गडमंडला " असें हल्लींही ह्मणतात. हे शहर नर्मदा नदीच्या काठीं असून, बी. एन. रेलवेच्या गोंदिया जबलपूर मार्गावर नैनपूर ह्मणून एक स्टेशन आहे. तेथून मंडलापर्यंत आगगाडीचा फांटा नेलेला आहे. नैनपूर है जबलपूरपासून ६९ व गोंदि बापासून ७३ मैलावर असून नैनपूरपासून मंडला २७ मेल आहे.