Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२१९)

मोडमध्ये गुजराथचा सुलतान महंमदशहा बेगडा हा विजयी झाला आणि त्याने नासीरखान फरूकीचा मुठीच्या वंशाकडील नातू-झणजे महंमदशहा बेगडा याच्या मुलीचा मुलगा - अदिलखान (दुसरा) यास गादीवर बसविलें त्याचें गुजराथचा सुलतान मुज्फूरशहा दुसरा, याच्या मुलीबरोबर लम झाले होते त्यामुळे त्यास सासन्याच्या - मदतीनें गादीवर स्थीर होतां आलें इतकेच नाहीं तर त्यास अहमदनगरकर निजाम- शाहीचा मांडलीक, हलों नाशिक जिल्ह्यांत असलेल्या गाळणा येथील राज्यकर्त्यांकडून खंडणीही मिळवितां आली. शिवाय, तो आपल्या सासन्याबरोबर माळवा प्रांतावरील मोहिमेंत हजर असून ती स्थानें प्रमुखत्वाने भाग घेतला होता. अदिरखान हा इ० सन १५२० मध्ये मृत्यू पावला, व त्याचा मुलगा मिरान महंमदखान हा राज्यावर आला.

 मिरान पार्ने गादीवर आल्यावर वन्हाडचा राज्यकर्ता अल्लाउद्दीन इमादशहा ( कारकीर्द इ० सन १४८४ - १५२७) याची मदत घेऊन बु-हाण निजामशहा ( कारकीर्द इ० सन १५०८ - १५५३ ) याच्यावर स्वारी केली; परंतु त्याचा तीत पराजय झाला; तेव्हां गुजराथचा सुलतान बहादूरशहा हा मिरानच्या मदतीस आला; व त्या उभयतांनी मिळून बु-हाणशहावर स्वारी करून त्यात बहादूरशहाचे वर्चस्व मान्य करणे भाग पांडिलें. ( इ० सन १५२६) त्यानंतर लवकरच त्याचे हुमायूनबरोबर युद्धप्रसंग सुरू झाले, त्यावेळी मिरान हा बहादूरशहाच रोचर होता; पुढे इ० सन १५३६ मध्ये बहादूरशहास पोर्तुगीज लोकांनी समुद्रांत बुडवून ठार मारिलें; तेव्हां दुरबारच्या मंडळींनी मिरान महंमद यास गुजराथच्या गादीवर बसविले; परंतु दोनच महिन्यांत तो मृत्यू पावला व इकडे खानदेशच्या गादीवर मिरानचा भाऊ मुबारिक व तिकडे गुजराथच्या गादीवर बहादूरशहाचा अज्ञान पुनण्या महंमदशहा हे गादीवर आले; तथापि गुजराथच्या दरबारातील कांहीं मंडळो मुबारिक याच्या पक्षाची असल्यामुळे त्यांनों, मुचारिक यास तिकडील गादीवर स्थानापन्न करण्याचा विचार केला; आणि मुचारिकही स्वतः तिकडे जाऊन त्या सर्वांनी मिळून तसा प्रयत्न केला; परंतु त्यांत त्यांना यश आलें नाहीं; तथापि सुलतानपूर व नंदुरबार हे दोन प्रांत मुबारिक यास मिळून त्याचा फायदा झाला. पुढे इ० सन १५६१ मध्ये पीर महंमदखान या नांवाच्या एका मोंगल सरदाराने, माळवा प्रांताच्या मार्गानें खानदेशावर सारी केली; आणि बऱ्हाणपूर शहराची कत्तल उडवून व सर्व प्रदेश उध्वस्त करून तो परत फिरला; परंतु मुबारिक यानें त्याचा पाठलाग करून व स्वास नर्मदानदीवर गांठून त्याचा पराभव करून अतिशय नाश उडविला; या सुलतानाने अजमासें बत्तीस वर्षे राज्य केलें; तो इ० सन १५६६ मध्यें मृत्यू पावला; आणि त्याचा मुलगा मिहान महंमद ( दुसरा ) हा गादीवर आला.