की, तो कसा तरी, मोठ्या कष्टानेंच थाळनेरे येथें सुरक्षित येऊन पोहोचला; व अहमद-
शहाशीं तह करून, आपण होऊन आपणांवर ओढून आणिलेल्या या संकटांतून आपली
मुक्तता करून घेतली. पुढे काही वर्षांनी मलिक नाशीरखान याची मुलगी मलिक-
जहान हिचे अहंमदशहा बहामनी याचा मुलगा अलाउद्दीनशहा याच्याशी लम झालें;
व अहंमदशहाची मदत घेऊन नातीर याने पुन्हां गुजराथच्या प्रदेशावर स्वारी केली;
परंतु याहीवेळी त्याचा पराभव होऊन त्यास माघार घ्यावी लागली. त्यानंतर अल्लाउ
दीन शहा हा सोनखेड येथील सौंदर्यसंपन्न राजकन्या परीचेहरा हिच्या प्रेमपाशांत
पूर्ण झाल्यामुळे मलिकजहान हीस वैषम्य उत्पन्न होऊन तिनें त्याबद्दल आपला
बाप मलिक नासीर याजकडे गान्हाणे केले; तेव्हा गुजराथचा सुलतान अहंमदशहा
याच्या मदतीने नासीर याने बहामनी राज्यावर स्वारी केली; आणि तीत त्यास पहिल्या
पहिल्याने यशही आले; परंतु पुढे त्याच्या नशिबाचा फांसा फिरला; त्यानें बहामनी
राज्यावर मारलेली मूठ त्याच्यावरच उलटली; बहामनी सरदार मलिकू उत्-तुजार यानें
त्याचा पूर्ण पराभव केला; त्याची राजधानी बुन्हाणपूर की शत्रूच्या हस्तगत झाली;
शत्रुसैन्याने त्याचा सारखा पिच्छा पुरविला, आणि शेवटीं लळिंग येथॉल किल्ल्यांत तो
कोंडला जाऊन, त्याच कष्टप्रद स्थितींत भायास आणि आपत्तींत इ० सन १४३७
मध्ये त्याचा अंत झाला.
नासीरखानाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा मिरान आदिलखान हा गादीवर
आला व त्याने गुजराथचा सुलतान अहंमदशहा याच्या मदतीनें लकिंगचा किल्ला पुन्हाँ
आपल्या हस्तगत करून घेऊन गुजराथच्या सैन्यास वेढा उठवून परत जाणें भाग
पाडिले; परंतु त्यानें अजमातें चार वर्षे राज्य केल्यानंतर इ० सन १४४१ मध्ये त्याचा
खून झाला; व त्याचा मुलगा मिरान मुचारिकखान हा गादीवर आला.
सुलतान मुबारिकसान हा मोठा शांतताप्रिय सुलतान असून त्याच्या कारकी-
दीत नमूद करण्यासारखी अशी विशेष महत्वाची गोष्ट घडली नाहीं; त्यानें शांततेने सतरा वर्षे
राज्याचा उपभोग घेऊन तो इ० सन १४५७ मध्ये मृत्यू पावला; व त्याचा बढील
मुलगा अदोलखान हा गादीवर आला.
सुलतान अदिलखान याची कारकीर्द पुष्कळ वर्षांची व विशेष महत्वाची आहे.
स्या एकंदर ४६ वर्षे राज्य केले व त्या अवधीत त्याने आपल्या राज्याची मजबुती
करून प्रजेचीही अतीशय भरभराट केली. त्यानें आसपासच्या राज्याकर्त्यांवर आपली
२८