मका संशय नसल्याने त्यानें त्या किल्लयांत घेऊ दिल्या. नंतर त्या लोकांनीं एकदम प्रगट होऊन, आशाचा, त्याच्या मुलांचा व इतर सर्व मंडळींचा नाश करून किल्ला आपल्या ताब्यांत घेतली. (इ०सने १३९९ ) नासीर वास ही जयाची बातमी समजल्यावर तो सतः अशीरगड येथे आला, त्याने तेथील किल्ला अधीक मजबूत केला व तें आपल्या राजधानीचे ठिकाण केलें. त्यानंतर लौकरव, त्या घराण्याचा धर्मगुरु सैनउद्दीन हा साधू- पुरुष या विजयाबद्दल नासीर याचे अभिनंदन करण्याकरितां तेथें आला व त्याच्या आज्ञे- ऊन नासीर यार्ने, झेनउद्दीन याच्या नांवाचें स्मारक ह्मणून सेनाबाद व दौलताबाद येथील प्रसिद्ध साधुपुरुष शेल बुन्हाणउद्दीन याच्या नांवाचें स्मारक हाणून बुन्हाणपूर ( न्हाणपूर हा बुन्हाणपूर या नांवाचा अपभ्रंश आहे.) हीं दोन शहरें तापीनदीच्या दोन काठावर समोरासमोर वसविली व पुढे हेच बुन्हाणपूर शहर खानदेशची राजधानी होऊन अतीशय भरभराटीस आले.
त्यानंतर इ० सन १४१७ मध्ये मलिक नासीर यास, आपला भाऊ इफ्ती- खान याच्याविषयीं विकल्प मनांत येऊन त्याने माळवा प्रांताचा सुलतान हुशंगशहा याची मदत मिळवून थाळनेर हे ठाणें आपल्या हस्तगत करून घेतले; व हफ्तीखानास पकडून अशीरगड येथे आणून प्रतिबंधांत ठेविले; नंतर हुशंगशहाच्याच मदतीने त्याने गुजराथचा सुलतान पहिला अहंमदशहा याच्या ताब्यांतील नंदुरबार - सुलतानपूरच्या प्रदेशावर चाल केली; परंतु त्यांत स्वास अपयश येऊन त्याची इतकी निरुष्टदशा झाली
टीप:- १ असाच प्रकार पुढील काळात शीरशहाने केला आहे. ज्याप्रमाण लर्निंगचा किल्ला मलिक नासीर यांच्या तापात होता, त्याचप्रमाणें चुनरगडचा किल्ला शरिशहाच्या ताब्यात होता. ज्यापमाणे नासीर यानें अशीरगडचा किल्ला अधिक मजबूत असल्याने आपल्या बायकामुलास तेथे ठेवण्याची आशा अहीर याजजवळ परवानगी मागितली होती, त्याप्रमाणेच शरिशहा यानेही रोहटसगडच्या बाबतींत तेथील किल्लेदार हरीकृष्ण याजजवळ मागितली होती; आणि त्याप्रमाणे उभयतांनाही तो मिळाल्यावर दोघांनाही सारखाच विश्वासघाताचा मार्ग पत्करून, सारखाच किल्ल्यांच्या मालकांचा "नाश करून, अशिरगंड व रोहटसगड हे किल्ले अनुक्रमे आपल्या सात मिळविले होते. तथापि अखेरीस किल्ल्यांचे मालक त्यांनी ठार मारिले, त्याचद्दल त्यांचा सूड उगविण्या- करितां कीं काय, पण किल्ल्यांनीच त्या उभयतांचा नाश केला; फरक इतकाच की, शीरशहाने स्वतः कालिंजर येथील किल्ल्यास वेढा घातला असता तो मृत्यू पावला 'आणि 'मलिक नासीर हा शत्रुतेन्याकडून लळींगच्या किल्ल्यास वेढा पडून व त्यांत कोंडला जाऊन मृत्यू पावला.