Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२१५)

आपल्या राज्यांतच स्वस्थपर्णे राहून व शेती सुधारून त्याने राज्याची भरभराट केली. ( इ० सन १३९४ - १३९९ ) दौलताबाद येथील प्रसिद्ध साधुपुरुष झेनउद्दीन हा त्याचा शिक्षक व धर्मगुरू होता व स्थानें मलिक यास एक शुभदायक व कल्याण- कारक " झगा, गुरुप्रसाद म्हणून दिला होता व तो त्याच्या घराण्याचा नाश होईपर्यंत प्रत्येक राज्यकत्यांकडून पुढील राज्यकर्त्यांस मोठ्या काळजीनें सोंपविण्यांत येत होता. मलिकराजा यानें आपल्या मृत्यूपूर्वी आपला वडील मुलगा मलिकनासीर याच्या स्वाधीन हा झगा केला. त्याच्या राज्यांत लळिंग व थाळनेर असे दोन किल्ले होते; त्यांपैकी लेकिंगचा किल्ला त्याने आपला वडील मुलगा मालक नासीर यास व थाळनेरचा किल्ला आपला धाकटा मुलगा इफ्तीखान यास दिला; मलिकराजा हा ता० २८ एप्रील इ० सन ११९९ रोजी थाळनेर येथें मृत्यू पावला; त्याठिकाणीं त्याची सुंदर कचर अद्यापि अस्तित्वांत आहे.

 मलिकराजा फरूकी याच्या मृत्यूनंतर त्याचा वडील मुलगा मलिक नासीर हा गादीवर आल्याबरोबर त्याने लागलीच बऱ्हाणपूरजवळील अशीरगडचा प्रसिद्ध किल्ला आपल्या ताब्यांत घेऊन, तें आपल्या राजधानीचे ठिकाण केले; आशा या नांवाचा एक अहोरजातीचा अति श्रीमंत राजा या काळात अशीरगड येथें असून त्यानेंच तो किल्ला बांधिला होता व किल्ला विशेष बळकटही होता; आशा हा अतीशय श्रीमंत होता व अशीर- गडसारखा मजबूत किल्ला त्याच्या ताब्यांत होता; तरीसुद्धां तो आपण होऊन मलिकराजा याच्या वर्चस्वाच्या आधीन झाला होता व मलिक यास त्याची सत्ता स्थापन करण्याच्या कामी त्याने अनेकप्रकारे मदत केली होती व नातीरसींही तो सख्यत्वाने वागत होता. त्यास नासीर यानें असें कळविलें कीं, " बागलाण, अंतूर आणि केहरला येथील राज्यकर्ते माझ्याबरोबर युद्धास उमे रहात आहेत; आणि माझ्या ताब्यांत फक्त लळिंगचा एकटाच काय तो किल्ला असून तोही अशीरगडसारखा मजबून नाहीं; त्यामुळे अशावेळीं लळिंग येथें बायकामुले ठेवणे धोक्याचे आहे; ह्मणून माझ्या मंडळींना राहण्याकरिता आपल्या किल्ल्यांत - जागा द्यावी. " आशा हा नासीर यास आपल्या सख्यत्वातील समजत असल्यामुळे, त्यानें नासीरच्या हलणण्यास ताबडतोच मान्यता दिली, त्यानंतर नासीरने हत्यारबंद शिपायांनी . भरलेल्या पडद्याच्या पालख्या अशीरगडावर पाठविल्या व आशाच्या मनांत कोणत्याही


 १ टीप:- १ लळिंग हें धुळे तालुक्यांत चाळीसगांव धुळे सडकेवर धुळया- - पासून ६ व चाळीसगांव पासून ३० मैलांवर असून तेथील किल्ला पूर्वकाळीं विशेष महत्वाचा ह्मणून गणला गेला होता.