Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२१४ )

योग्य मदत देऊन त्याची उत्तम काळजी घेतली; त्यामुळे बादशहानें खुष होऊन त्यास खानदेशच्या सरहद्दीवरील थाळनेर व करांडा हे दोन बादशाही अमलाखालील प्रदेश/- पेकींचे परगणे त्यास बहाल केले; मलिक हा मूळचा उच्चकुलातील असून तो खलीफा उमर याचे आपण बावीसावे वंशज आहों असें ह्मणत असे व त्याचा बापू चंदजेहान हा अलाउद्दीन खिलजीच्या कारकीदर्ति वजीरीपदावर असे. मलिक हा आपल्या या छोट्याशा जहागिरीत स्थानापन्न झाल्यावर त्यानें Xबागलाणचा राजा भारजी याच्यावर स्वारी केली; आणि त्याचा पराभव करून, त्यास दिल्लीपतीला वार्षिक खंडणी पाठविण्यास भाग पाडिलें व दिल्लीपतीकडे सोनेरी नक्षीकाम केलेल्या भरगची मौल्यवान् झुलांसह कहीं हत्ती व अनेक उंटांवर खानदेशमध्ये उत्पन्न होणारी उत्तम मलमल व इतर जिन्नस, नजराणे ह्मणून पाठविले. त्यामुळे बादशहानें खुष होऊन त्यास " सिपाई सलार " - हणजे बहादूर शिपाई अथवा सेनापति-असा किताब दिला व त्याची मनसब तीन हजार घोडेस्वारांनीं वाढविली. त्यानंतर लवकरच त्याच्याजवळ बारा हजार घोडे- स्वारांचे सैन्य जमले; त्यानें आसपासच्या प्रदेशांवर आपला उत्तमप्रकारे दारारा बस- विला; आसपासचे सत्ताधारी त्याच्या मैत्रीची अपेक्षा करूं लागले; आणि पुढे फिरोज तुहल याच्या मृत्यूनंतर, मलिक राजीचा मुलगा मलिक नासीर याचें माळवा प्रांताचा स्वतंत्र राज्यकर्ता दिलावरखान घोरी याच्या मुलीशीं लम झाल्यामुळे ( इ० सन १३९० म ) तर मलिक राजाचा पक्ष पुष्कळच प्रचळ होऊन त्याचें अतीशय वर्चस्व वाढलें. त्यानंतर गुजराथप्रति सर करण्याच्या इराद्यानें त्यानें गुजराथचा नुकताच स्वतंत्र बनलेला राज्यकर्ता मुस्कूरशहा याच्या ताब्यांतील सुलतानपूर व नंदुरबारच्या प्रदेशावर स्वारी केली; परंतु मुज्कूरशहास ही बातमी समजल्याबरोबर - जरी त्यानेही हे बादशाही जिल्हे बळकाविले होते तरी तो झपाट्यानें कूच करून तिकडे आला; आणि त्याचा पराभव करून त्यास थाळनेर येथे परत पिटाळून लावले. त्यानंतर तो


 X टीप:- १ बागलाण हा नाशिक जिल्ह्यांत एक तालुका असून त्याचे सटाणे हे मुख्य ठिकाण आहे. जी. आय. पी. क्या मनमाड स्टेशन पासून मालेगांव सडकेनें अजमासें २४ मैल व पुढे सटा २४ मैल आहे; व थेटपर्यंत पक्की सडक आहे.

 x टीप:- २ थाळनेर हा गाँव, पश्चिम खानदेशांत, शिरपूर तालुक्यांत तापी नदीच्या काठी, धुळ्यापासून ईशान्येस अजमासे २८ मैलांवर व शिरपूर पासून अजमासे सोळा मैलांवर आहे; व शिरपूर हैं ताप्ती व्हॅली रेलवेच्या नरढाणा या स्टेशन- पासून अजना १२ मैलांवर मुंबई आग्रा रोडवर आहे व या तालुक्यास होळकराच्या राज्यातील शेंधवा तालुक्याची हद्द लागलेली आहे.